• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Pune »
  • Pune Police Has Launched A Scheme To Create A Safe Traffic System

नियमभंगाच्या तक्रारी करा अन् 50 हजार रुपये मिळवा; पुणे वाहतूक पोलिसांची योजना

वाहतूक नियमभंग करणाऱ्यांवर जोरदार कारवाई सुरू असतानाच आता पुणे पोलिसांनी नियभंग करणाऱ्यांची सर्वाधिक तक्रारी नोंदवणाऱ्या नागरिकाला ५० हजार रुपयांचे बक्षीस देण्याची योजना सुरू केली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Feb 13, 2026 | 11:39 AM
नियमभंगाच्या तक्रारी करा अन् 50 हजार रुपये मिळवा; पुणे वाहतूक पोलिसांची योजना

संग्रहित फोटो

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • पुण्यात वाहतूक शिस्तीचा प्रश्न कायम
  • नियमभंगाच्या तक्रारी करा अन् 50 हजार रुपये मिळवा
  • पुणे वाहतूक पोलिसांची नागरिकांसाठी योजना
पुणे : वाहतूक नियमभंग करणाऱ्यांवर जोरदार कारवाई सुरू असतानाच आता पुणे पोलिसांनी नियभंग करणाऱ्यांची सर्वाधिक तक्रारी नोंदवणाऱ्या नागरिकाला ५० हजार रुपयांचे बक्षीस देण्याची योजना सुरू केली आहे. वाढती वाहतूक कोंडी, बेदरकार वाहनचालक आणि नियमभंगाच्या घटनांना आळा घालण्यासाठी नागरिकांच्या सहभागातून ही अभिनव योजना सुरू करण्यात आली आहे.

पुणे शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी सर्वस्थरीय उपाययोजना सुरू केल्या आहेत. पालिका प्रशासनाला देखील सोबत घेऊन अनेक ठिकाणी बदल केले आहेत. तर वाहतूक पोलिसांनाही सतत सूचना देत नियमभंग करणाऱ्यांवर कडक कारवाईचे आदेश दिले आहेत. सिग्नल तोडणे, ट्रिपल सीट, नो-एंट्रीतून वाहन चालवणे, भरधाव वाहन चालवणे, मोबाईलवर बोलत वाहन चालवणे, मद्यपान करून वाहन चालवणे अशा नियमभंगाच्या घटनांमध्ये सातत्याने दिसून येत आहेत. नियमभंग करणाऱ्या चालकांवर कारवाई होत असली तरी अनेकजण दंड भरून सुटका करून घेत असल्याने वाहतूक शिस्तीचा प्रश्न कायम आहे.

वाहतूक पोलिसांनी ‘पीटीपी’ (Pune Traffic Police) या अधिकृत मोबाईल अ‍ॅपद्वारे नागरिकांना नियमभंग करणाऱ्या वाहनांचे फोटो किंवा व्हिडिओ अपलोड करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या अ‍ॅपच्या माध्यमातून प्राप्त तक्रारींच्या आधारे संबंधित वाहनचालकांवर कारवाई केली जाणार आहे. या योजनेअंतर्गत महिन्याभरात सर्वाधिक तक्रारी नोंदवणाऱ्या नागरिकाला ५० हजार रुपयांचे प्रथम पारितोषिक दिले जाणार आहे. दुसऱ्या क्रमांकासाठी २५ हजार रुपये, तर तिसऱ्या क्रमांकासाठी १५ हजार रुपयांचे पारितोषिक जाहीर करण्यात आले आहे.

वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त हिंमत जाधव यांनी सांगितले की, या अ‍ॅपमध्ये १३ प्रकारच्या वाहतूक नियमभंगाचा समावेश केला आहे. ट्रिपल सीट, फुटपाथवर वाहन पार्किंग, फॅन्सी नंबर प्लेट, भरधाव वाहन चालवणे, वाहन चालवताना मोबाईलचा वापर, सिग्नल उल्लंघन अशा विविध प्रकारांबाबत नागरिक थेट पुरावे अपलोड करू शकतात. प्रत्येक तक्रारीची सखोल पडताळणी केली जाईल आणि माहिती देणाऱ्या नागरिकाची ओळख पूर्णपणे गोपनीय ठेवली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

ही योजना पुढील ६ महिन्यांसाठी राबविण्यात येणार असून, डिसेंबर महिन्याचे विजेते नुकतेच जाहीर करण्यात आले आहेत. जानेवारी महिन्याचे विजेतेही लवकरच जाहीर केले जाणार असल्याचे सांगण्यात आले. नागरिकांच्या सहभागातून शिस्तबद्ध व सुरक्षित वाहतूक व्यवस्था निर्माण करण्याचा हा उपक्रम असल्याचे पोलिसांनी नमूद केले.

हे सुद्धा वाचा : कॉन्स्टेबलचा पोलिस ठाण्यातच धिंगाणा; कपडे काढून उपनिरीक्षकाला केली मारहाण

Web Title: Pune police has launched a scheme to create a safe traffic system

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 13, 2026 | 11:39 AM

Topics:  

  • CM Devedra Fadnavis
  • pune news
  • Traffic Police

संबंधित बातम्या

समाविष्ट गावांचे नियोजन आता महापालिकेकडे; माधुरी मिसाळ यांच्या पाठपुराव्याला यश
1

समाविष्ट गावांचे नियोजन आता महापालिकेकडे; माधुरी मिसाळ यांच्या पाठपुराव्याला यश

PUNE NEWS : दहा महिने अंथरुणाला खिळलेली १४ वर्षांची निलीमा; ससूनमध्ये उपचारांमुळे पुन्हा उभी राहिली
2

PUNE NEWS : दहा महिने अंथरुणाला खिळलेली १४ वर्षांची निलीमा; ससूनमध्ये उपचारांमुळे पुन्हा उभी राहिली

Pune News :  MIT-WPU मध्ये बांगलादेशी फूड स्टॉलची तोडफोड,BJP युवा मोर्चा कार्यकर्त्यांचा राडा
3

Pune News : MIT-WPU मध्ये बांगलादेशी फूड स्टॉलची तोडफोड,BJP युवा मोर्चा कार्यकर्त्यांचा राडा

Pune Zp : पुणे झेडपीच्या नव्या पदाधिकाऱ्यांना जुन्याच सुविधा; अध्यक्षांना मिळणार ‘हा’ बंगला
4

Pune Zp : पुणे झेडपीच्या नव्या पदाधिकाऱ्यांना जुन्याच सुविधा; अध्यक्षांना मिळणार ‘हा’ बंगला

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Ranveer Singh च्या संपूर्ण टीमला जीवे मारण्याची धमकी; लॉरेन्स बिश्नोई गँगकडून व्हॉइस नोट पाठवल्याचा दावा

Ranveer Singh च्या संपूर्ण टीमला जीवे मारण्याची धमकी; लॉरेन्स बिश्नोई गँगकडून व्हॉइस नोट पाठवल्याचा दावा

Feb 13, 2026 | 01:15 PM
School Bomb Threat: ‘या’ शाळांना बॉम्बने उडवण्याची धमकी, विद्यार्थी आणि शिक्षकांना सुरक्षितपणे बाहेर काढले

School Bomb Threat: ‘या’ शाळांना बॉम्बने उडवण्याची धमकी, विद्यार्थी आणि शिक्षकांना सुरक्षितपणे बाहेर काढले

Feb 13, 2026 | 01:11 PM
IND vs PAK : उस्मान तारिकची बाॅलिंग अ‍ॅक्शन टीम इंडियासाठी मोठा धोका, धोनीने बदलले त्याचे आयुष्य

IND vs PAK : उस्मान तारिकची बाॅलिंग अ‍ॅक्शन टीम इंडियासाठी मोठा धोका, धोनीने बदलले त्याचे आयुष्य

Feb 13, 2026 | 01:10 PM
Nothing घेऊन आला सर्वात भारी ऑफर! केवळ 99 रुपयांत मिळणार CMF Buds 2, अशी डील पुन्हा मिळणार नाही…

Nothing घेऊन आला सर्वात भारी ऑफर! केवळ 99 रुपयांत मिळणार CMF Buds 2, अशी डील पुन्हा मिळणार नाही…

Feb 13, 2026 | 01:00 PM
चॉकलेट-फुलांपेक्षा मोठं प्रेझेंट; यंदा ‘व्हॅलेंटाईन डे’ला जोडीदाराला द्या सुरक्षित भविष्याची भेट

चॉकलेट-फुलांपेक्षा मोठं प्रेझेंट; यंदा ‘व्हॅलेंटाईन डे’ला जोडीदाराला द्या सुरक्षित भविष्याची भेट

Feb 13, 2026 | 01:00 PM
India-France Defence Deal: भारतची फ्रान्ससोबत भक्कम भागीदारी; हवाई आणि सागरी सुरक्षेत घेणार मोठी झेप

India-France Defence Deal: भारतची फ्रान्ससोबत भक्कम भागीदारी; हवाई आणि सागरी सुरक्षेत घेणार मोठी झेप

Feb 13, 2026 | 12:55 PM
Ajit Pawar Accident : जीवघेण्या विमान कंपनीवर कारवाई का नको? रोहित पवारांनी उपस्थित केला सवाल

Ajit Pawar Accident : जीवघेण्या विमान कंपनीवर कारवाई का नको? रोहित पवारांनी उपस्थित केला सवाल

Feb 13, 2026 | 12:55 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Thane News  : ठाण्यातील वृक्षतोडीविरोधात राष्ट्रवादी आक्रमक

Thane News : ठाण्यातील वृक्षतोडीविरोधात राष्ट्रवादी आक्रमक

Feb 12, 2026 | 07:57 PM
Thane : नव्या कामगार कायद्यांविरोधात अंगणवाडी सेविकांचे आंदोलन

Thane : नव्या कामगार कायद्यांविरोधात अंगणवाडी सेविकांचे आंदोलन

Feb 12, 2026 | 07:48 PM
Kalyan : “लोकलमधील गर्दी टाळण्यासाठी समांतर रस्त्याचे काम सुरु करा” – राजेश मोरे

Kalyan : “लोकलमधील गर्दी टाळण्यासाठी समांतर रस्त्याचे काम सुरु करा” – राजेश मोरे

Feb 12, 2026 | 07:30 PM
Parbhani : “सर्वधर्मसमभाव समोर ठेवूनच आम्ही मुस्लिम महापौर निवडला”- राहुल पाटील

Parbhani : “सर्वधर्मसमभाव समोर ठेवूनच आम्ही मुस्लिम महापौर निवडला”- राहुल पाटील

Feb 12, 2026 | 07:23 PM
Kalyan : खडे गोलवली नाला पुलाचे काम सुरू, दोन दिवस वाहतूक बंद

Kalyan : खडे गोलवली नाला पुलाचे काम सुरू, दोन दिवस वाहतूक बंद

Feb 12, 2026 | 02:54 PM
Jalna : ट्रेड डीलच्या अफवांमुळे सोयाबीनचे दर घसरले

Jalna : ट्रेड डीलच्या अफवांमुळे सोयाबीनचे दर घसरले

Feb 12, 2026 | 02:51 PM
Jalgaon News : पोलीस भरतीच्या मैदानी चाचणीला आजपासून सुरुवात

Jalgaon News : पोलीस भरतीच्या मैदानी चाचणीला आजपासून सुरुवात

Feb 11, 2026 | 07:56 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.