पॉइन्सेटिया हे एक रंगीबेरंगी, सुंदर हिवाळी फूल आहे ज्याला ख्रिसमसच्या काळात घराची शोभा वाढवण्यासाठी आणले जाते. हे फूल त्याच्या चमकदार लाल पानांमुळे ओळखले जाते. दिसायला हे फूल आकर्षित वाटतात ज्यामुळे अनेकजण यांना आपल्या घराच्या बाल्कनीत सजवतात. पण अनेकांनी हे ठाऊक नाही की हे फूल काही अंशी विषारी असल्याचे मानले जाते.
तुम्हीही 'या' फुलाला बाल्कनीत सजवताय? ख्रिसमस फ्लॉवरच्या नावाने ओळखलं जाणारं हे फूल आहे साैम्य विषारी

अनेकजण याच्या लाल भागाला फूल समजतात परंतु याच्या मध्यभागी असणारा पिवळसर भाग म्हणजे खरी फूले आहेत. हे फूल त्याच्या चमकदार लाल फूलांमुळे ओळखली जातात.

अनेकांना हे ठाऊक नाही पण ही फूले साैम्य विषारी असतात, म्हणूनच त्यांना लहान मुलांपासून आणि प्राण्यांपासून दूर ठेवायला हवे.

ही फूले फक्त लालच नाही तर पांढरा, गुलाबी, पीच आणि सोनेरी या रंगातही उपलब्ध आहेत. या फूलाचे रोप घरात सकारात्मक ऊर्जा आणि आनंद आणते.

हे फूल थंड वातावरणात आणि सूर्यप्रकाश असणाऱ्या ठिकाणी चांगले वाढते. थेट सूर्यप्रकाश त्याला हानी पोहचवू शकते.

सण आणि खास प्रसंगी गिफ्ट देण्यासाठी ही वनस्पती खूप लोकप्रिय आहे.






