जगभरात मुलांसाठी स्मार्टवॉचची मागणी वाढत आहे. पालक त्यांच्या मुलांच्या आरोग्यावर आणि त्याहूनही महत्त्वाचे म्हणजे त्यांच्या सुरक्षिततेवर लक्ष ठेवण्यासाठी स्मार्टवॉच खरेदी करत आहेत. स्मार्टवॉचमध्ये अशी अनेक वैशिष्ट्ये उपलब्ध आहेत, ज्यांच्या मदतीने मुलांचे आरोग्य देखील ट्रॅक केले जाऊ शकते जेणेकरून पालकांना मुलांच्या आरोग्याची काळजी घेता येईल. आज आम्ही तुम्हाला मुलांच्या स्मार्टवॉचमध्ये कोणत्या वैशिष्ट्यांचा समावेश असावा याबद्दल सांगणार आहोत. (फोटो सौजन्य – Pinterest)
Tech Tips: मुलांच्या स्मार्टवॉचमध्ये हे महत्त्वाचे फीचर्स असलेच पाहिजे, खरेदी करण्यापूर्वी लक्षात ठेवा
जर तुम्ही नवीन स्मार्टवॉच खरेदी करणार असाल तर सर्वात आधी स्मार्टवॉचमधील फीचर्स तपासून पाहा.
मुलांच्या स्मार्टवॉचमध्ये जीपीएस असणे आवश्यक आहे. याच्या मदतीने, मुलावर रिअल-टाइममध्ये लक्ष ठेवता येते. शाळेत जाण्यापासून ते खेळण्यापर्यंत, पालक नेहमीच त्यांच्या मुलांवर लक्ष ठेवू शकतात.
टू-वे कॉलिंगमुळे मुले एकमेकांशी संवाद साधू शकता. तसेच पूर्व-मंजूर संपर्कांशी बोलू शकतात. हे वैशिष्ट्य कठीण काळात खूप उपयुक्त ठरू शकते.
मुले कुठेतरी कठीण परिस्थितीत अडकली असतील तर एसओएस बटण वैशिष्ट्य खूप उपयुक्त आहे. त्याच्या मदतीने, मुले त्यांच्या पालकांना सतर्क करू शकतात जेणेकरून त्यांना त्वरित मदत मिळू शकेल.
जिओफेन्सिंगच्या मदतीने एक आभासी कुंपण तयार करता येते. जेव्हा जेव्हा मुले बाहेर जातात किंवा आत येतात तेव्हा पालकांना सूचना मिळते. यामुळे पालकांना त्यांचे मूल कुठे खेळत आहे किंवा तो वेळेवर शाळेत पोहोचला आहे की नाही हे जाणून घेणे सोपे होते.
सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे साधा इंटरफेस. स्मार्टवॉचचा इंटरफेस इतका सोपा असावा की लहान मुलेही ते सहज चालवू शकतील. मुलांना जास्त अॅप्सची आवश्यकता नसते. म्हणून, कठीण इंटरफेस असलेले स्मार्टवॉच खरेदी करणे टाळावे.