दक्षिण आफ्रिकेचा एकदिवसीय संघ जाहीर(फोटो -सोशल मीडिया)
AUS vs SA : ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात यांच्यात नुकतीच तीन सामन्यांची टी २० मालिका खेळवण्यात आली. या मालिकेत ऑस्ट्रेलिया संघाने २-१ अशी मालिका जिंकली. आता या दोन संघात तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळली जाणार आहे. या मालिकेसाठी दक्षिण आफ्रिकेकडून आपला संघ जाहीर करण्यात आला आहे. दक्षिण आफ्रिकेने १७ सदस्यीय संघ जाहीर केला आहे. युवा फलंदाज डेवाल्ड ब्रेव्हिस आणि वेगवान गोलंदाज क्वेना म्फाका यांना एकदिवसीय संघात स्थान देण्यात आले आहे. या मालिकेत हे दोघेही या मालिकेत पदार्पण करण्याची शक्यता आहे.
दक्षिण आफ्रिकेचा संघ एकदिवसीय मालिकेत मालिका विजय मिळवत ऑस्ट्रेलियाचा निरोप घेण्यासाठी प्रयत्नशील असणार आहे. त्याच वेळी, एकदिवसीय संघाचे नेतृत्व टेम्बा बावुमाकडे सोपवण्यात आले आहे. त्याच वेळी, केशव महाराजने संघात पुनरागमन केले आहे. याशिवाय, अनेक लुआन-ड्रे प्रिटोरियस आणि प्रीनेलन सुब्रियन सारख्या नवीन चेहऱ्यांना देखील संघात संधी दिली गेली आहे.
हेही वाचा : RCB च्या खेळाडूंचा The Hundred मध्ये धुमाकूळ! १३ चेंडूत चोपल्या ५० धावा; १३६ वर्षांचा मोडला विक्रम
टी-२० मालिकेत दक्षिण आफ्रिकेसाठी आपल्या गोलंदाजीने प्रभावित करणाऱ्या क्वेना म्फाकाल एकदिवसीय संघात स्थान देण्यात आले आहे. त्याने टी २० मालिकेत ऑस्ट्रेलियाविरुद्ध ९ विकेट्स घेतल्या आहेत. पहिल्या सामन्यात त्याने ४ विकेट्स घेतल्या होत्या तर दुसऱ्या सामन्यात त्याने ३ विकेट्स घेतल्या होत्या. तिसऱ्या सामन्यात म्फाकाने २ विकेट्स मिळवल्या. तसेच या टी-२० मालिकेत देवाल्ड ब्रेव्हिस ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनला. त्याने होता. त्याने तीन डावात ९० च्या सरासरीने १८० धावा केल्या. त्याच्या शानदार कामगिरीनंतर, आता त्याला एकदिवसीय सामन्यात संधी देण्यात आली आहे.
एकदिवसीय मालिका सुरू होण्यापूर्वी, दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बावुमाने पत्रकार परिषदेमध्ये आपली प्रतिक्रिया दिली. तो म्हणाला जेव्हा तुम्ही तरुण खेळाडू पाहतया असता ते नेहमीच रोमांचक असते. अर्थातच सर्वांच्या नजरा ब्रेव्हिसवर असतात. तो त्याची ताकद दाखवून देता आहे. तो एकदिवसीय सामन्यांमध्ये किती आश्चर्यकारक कामगिरी करू शकतो हे पाहण्यासाठी मी आतुर आहे.
हेही वाचा : Photo : 290 डावांनंतर एकदिवसीय क्रिकेटमध्ये शतकांचा राजा कोण? भारताचे तीन खेळाडू टाॅप 5 मध्ये सामील
ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेला १९ ऑगस्टपासून सुरवात होत आहे. पहिला सामना केर्न्समध्ये खेळला जाणार आहे. त्यानंतर २२ ऑगस्ट रोजी मॅके येथे दुसरा तर तिसरा आणि शेवटचा एकदिवसीय सामना देखील २४ ऑगस्ट रोजी मॅके येथे खेळला जाणार आहे.
टेम्बा बावुमा (कर्णधार), मॅथ्यू ब्रीट्झके, कॉर्बिन बॉश, देवाल्ड ब्रेव्हिस, नांद्रे बर्गर, टोनी डी जियोर्गी, एडेन मार्कराम, क्वेना म्फाका, सेनुरन मुथुसामी, केशव महाराज, वियान मुल्डर, लुआन-ड्रे प्रिटोरियस, लुंगी एनगिडी, कागिसो रबाडा, रायन रिकेल्टन, ट्रिस्टन स्टब्स आणि प्रेनेलन सुब्रायन.