भारत विरुद्ध बांग्लादेश : भारत विरुद्ध बांग्लादेश यांच्यामध्ये मालिकेचा दुसरा T२० सामना पार पडला. यामध्ये भारताच्या संघाने कमालीची कामगिरी केली. भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने मालिकेमध्ये आघाडी घेत मालिका २-० ने नावावर केली आहे परंतु अजुनपर्यत एक सामना या मालिकेचा शिल्लक आहे. बांग्लादेशच्या संघाने नाणेफेक जिंकून पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. यामध्ये भारताच्या फलंदाजांनी बांग्लादेशच्या गोलंदाजांना चांगलंच धुतलं. भारताच्या संघाने मालिकेचा दुसऱ्या T२० सामन्यात संघाने कशी कामगिरी केली यावर एकदा नजर टाका.
फोटो सौजन्य - BCCI सोशल मीडिया
भारताच्या संघाने फलंदाजीचे आव्हान स्वीकारत विस्फोटक फलंदाजी करून २२२ धावांचे लक्ष्य बांग्लादेशसमोर उभे केले होते. फोटो सौजन्य - BCCI सोशल मीडिया
भारताचा फिनिशर रिंकू सिंहने टीम इंडियासाठी अर्धशतक झळकावले. त्याने २९ चेंडूंमध्ये ५३ धावांची खेळी खेळली आणि तो बाद झाला. फोटो सौजन्य - BCCI सोशल मीडिया
भारताचा स्टार अष्टपैलू हार्दिक पांड्याने पहिल्या सामन्यात देखील मॅच विनीग खेळी खेळली त्याचबरोबर त्याने भारतासाठी दुसऱ्या सामन्यात देखील ३२ धावांची खेळी खेळली. फोटो सौजन्य - BCCI सोशल मीडिया
भारताचा युवा फलंदाज नितीश कुमार रेड्डीने त्याच्या दुसऱ्याच आंतरराष्ट्रीय सामन्यात ७४ धावांची खेळी खेळली. त्याने केलेल्या फलंदाजीने बांग्लादेशच्या कोणत्याच गोलंदाजाला त्याने सोडलं नाही. फोटो सौजन्य - BCCI सोशल मीडिया
गोलंदाजीमध्ये पुन्हा एकदा भारताचा फिरकीपटू वरून चक्रवर्तीने २ विकेट्स नावावर केले, त्याचबरोबर नितीश कुमार रेड्डीने गोलंदाजीमध्ये सुद्धा कमाल केली आणि २ विकेट्स नावावर केले.