जगभरातील लाखोंच्या संख्येने पर्यटक भारतासह इतर वेगवेगळ्या देशांमध्ये फिरायला जातात. कामाच्या धावपळींमधून थोडासा वेळ काढत निर्सगाच्या सानिध्यांत बाहेर फिरून आल्यानंतर मानसिक तणाव कमी होतो आणि मन सुद्धा आनंदी होते. बाहेरील देशांच्या पर्यटनासाठी कायमच पासपोर्ट आणि विजाची आवश्यकता असते. पण आज आम्ही तुम्हाला भारतीय पर्यटकांना कोणत्या देशात फिरण्यासाठी पासपोर्टची आवश्यकता लागत नाही, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. कमीत कमी बजेटमध्ये तुम्ही मजेशीर ट्रिप करू शकता.(फोटो सौजन्य – istock)
भारतीय पर्यटकांना 'या' देशांमध्ये फिरण्यासाठी लागणार नाही पासपोर्टची गरज
भुतानमधील सौंदर्य पर्यटकांना मोहात पडते. तुम्हाला जर शांत वातावरणात फिरायला जायचे असेल तर तुम्ही भूतानला जाऊ शकता. इथे जाण्यासाठी ५० हजार इतका खर्च येतो.
मालदीवमध्ये असलेले समुद्रकिनारे पर्यटकांना आकर्षित करतात. मालदीवमध्ये गेल्यानंतर तुम्ही समुद्रकिनारी फिरण्याचा आणि तिथे असलेल्याबांबू हाऊसमध्ये राहण्याचा आनंद घेऊ शकता.
भारतीय पर्यटकांना मॉरीशस तिथे गेल्यानंतर पासपोर्ट देतात. इथे असलेले सुंदर बीच, नैसर्गिक सौंदर्य सगळ्यांचं खूप जास्त आवडते. त्यामुळे कमीत कमी खर्चात तुम्ही मॉरीशस ट्रिप करू शकता.
श्रीलंकेमध्ये गेल्यानंतर कोलंबो, कॅंडी आणि सिगिरिया किल्याला आवर्जून भेट द्यावी. तिथे जाण्यासाठी ३० हजार एवढाच खर्च येतो.
भारतीय पर्यटकांना नेपाळ फिरण्यासाठी कोणत्याही पासपोर्टची आवश्यकता लागत नाही. नेपाळ हा भारताच्या शेजारील देश आहे. नेपाळमध्ये जाऊन तुम्ही काठमांडू, पोखरा आणि हिमालया इत्यादी ठिकाणी फिरण्याचा आनंद घेऊ शकता.