पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तिसऱ्या टर्ममधील पहिले बजेट सादर केले जाणार आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण या आपल्या खास शैलीमध्ये सादर करणार आहेत. निर्मला सीतारमण या यंदा आठव्यांदा अर्थसंकल्प सादर करणार आहे. अर्थसंकल्पातील तरतूदींसह निर्मला सीतारमण यांचे लूक देखील नेहमीच चर्चेत असतात. भारतीय शैलीचे दर्शन घडवणारे सीतारमण यांचे कॉटन साडीचे लूक लक्षवेधी ठरतात.
India's Union Finance Minister Nirmala Sitharaman wore 7 cotton saree looks while presenting the budget
मागील वर्षी 2024 चा सलग सातव्यांदा अर्थसंकल्प सादर करताना निर्मला सीतारमण यांनी खास लूक केला होता. मॅजेन्टा बॉर्डर असलेली ऑफ-व्हाइट किंवा क्रीम रंगाची साडी परिधान केली होती. राष्ट्रपतींना भेटण्यासाठी जाण्यापूर्वी निर्मला सीतारमण यांनी फोटो काढला होता.
लोकसभा निवडणूकीपूर्वी 2024 चा अंतरिम अर्थसंकल्प सादर करताना, अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी कांथाने शिवलेली निळी आणि क्रीम रंगाची साडी परिधान केली होती. या प्रकारची शिलाई पश्चिम बंगालमध्ये प्रसिद्ध आहे.
2023 चा केंद्रीय अर्थसंकल्प सादर करताना निर्मला सीतारमण यांनी पारंपारिक मंदिराचा काठ असलेली लाल साडी नेसली होती. कर्नाटकातील धारवाड भागातील हाताने विणलेली 'इल्कल' रेशमी साडी होती ज्यावर पारंपारिक 'कसुती' काम केलेल होते.
२०२२ या वर्षीचा अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्र्यांनी ओडिशाच्या हातमाग उद्योगाला समर्पित अशी साडी परिधान केली होती. त्यांनी ओडिशामध्ये बनवली जाणारी तपकिरी रंगाची बोमकाई साडी घातली होती. कसुती ही लोककलेची एक पारंपारिक कढ़ाई आहे, ज्याला भौगोलिक संकेत (GI) टॅग मिळाला आहे, जो धारवाड प्रदेशासाठी अद्वितीय असल्याचे म्हटले जाते.
केंद्रीय अर्थसंकल्प २०२१ सादर करताना सीतारमण यांनी लाल बॉर्डर असलेली ऑफ-व्हाइट पोचमपल्ली सिल्क साडी निवडली. साडीच्या काठावर इकतची रचना होती. पोचमपल्ली इकत हे 'भारताचे रेशीम शहर' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तेलंगणाची खासियत आहे.
केंद्रीय अर्थसंकल्प २०२० सादर करताना त्यांनी पिवळ्या रेशमी साडी नेसली होती. भारतात, पिवळा रंग शुभ मानला जातो आणि समृद्धी आणतो असे मानले जाते.
केंद्रीय अर्थसंकल्प २०१९मध्ये निर्मला सीतारमण यांनी पहिल्यांदा अर्थसंकल्प सादर केला होता. यावेळी त्यांनी सोनेरी बॉर्डर असलेली चमकदार गुलाबी मंगलागिरी सिल्क साडी परिधान केली होती. त्यांनी पहिल्यांदाच बजेट ब्रीफकेसच्या जागी पारंपारिक 'बही खाता', जो समृद्धीचे प्रतीक होता, लाल रंगाचा होता, ठेवला. त्या खात्याच्या कागदपत्रात सोनेरी धागे आणि वरच्या बाजूला राष्ट्रीय चिन्ह होते.