आपल्या मुलांनी चांगल्या शाळेत शिकावं असं प्रत्येक पालकांना वाटतं. आजकाल शैक्षणिक क्षेत्रात देखील मोठ्या प्रमाणात स्पर्धा वाढत आहेत. त्यामुळे आपल्या मुलांना चांगलं शिक्षण मिळावं यासाठी पालकांची धडपड सुरु असते. अशीच एक जगातली सर्वात महागडी शाळा आहे. ज्या शाळेची फी ऐकून थक्क व्हायला होईल.
चांगल शिक्षण मिळावं म्हणून एका ठराविक महाविद्यालयात प्रवेश मिळावा असं प्रत्येकाचं स्वप्नं असतं. मात्र अशीही एक शाळा आहे जिथे शिकण्याचं प्रत्येकाचं स्वप्नं असलं तरी ते सगळ्यांचीच पूर्ण होत नाही.
अशी एक शाळा जी जगातील सर्वात महागडी असल्याचं म्हटलं जात आहे. अशी ही श्रीमंतांची शाळा आहे स्वित्झर्लंडमध्ये.
स्वित्झर्लंडच्या या शाळेत 50 हून अधिक देशांतील मुलं शिकण्यासाठी या शाळेत येतात.
स्विझर्लंडमधील Institut Le Rosey ही श्रीमंतांची शाळा म्हणून ओळखली जाते. माहितीनुसार या शाळेत स्पेन, बेल्जियम, इजिप्त, ईरान आणि ग्रीस या देशांच्या राजांची मुलं शिक्षण घेतात.
या शाळेची वर्षाची फी जवळपास 1 कोटी इतकी आहे. या शाळेची स्थापना 1880 मध्ये पॉल कर्नलने केली होती. या शाळेत जवळपास 280 विद्यार्थी शिक्षण घेतात.
शालेय शिक्षणाप्रमाणेच या शाळेत कला आणि क्रिडा या क्षेत्रांना देखील तितकंच महत्त्व दिलं जातं.
या शाळेत टेनिस कोर्ट, शूटिंग रेंज आणि जवळपास 4 अब्ज खर्च करून बनवलेला एक मोठा कॉन्सर्ट हॉल सुद्धा आहे.