सध्या प्राईम व्हिडिओ वरील 'पंचायत' वेबसीरिज कमालीची चर्चेत आहे. नुकताच या वेब सीरिजचा चौथा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला आला. चाहत्यांमध्ये या वेबसीरिजची जोरदार चर्चा सुरू आहे. वेब सीरिजची टीम प्रमोशनमध्ये व्यग्र असून प्रमोशन दरम्यान 'पंचायत' वेबसीरिजच्या टीमने पिकलबॉलच्या खेळाडूंच्या लूकमध्ये फोटोशूट केले आहे. सर्वच कलाकारांच्या लूकने चाहत्यांचे लक्ष वेधले.
Panchayat 4 Star Cast Photos
वेबसिरिजमध्ये प्रधानची पत्नी मंजूदेवी यांची भूमिका साकारणाऱ्या नीना गुप्ता देखील या फोटोशूटमध्ये दिसत आहेत. या शूटमध्ये नीना गुप्ता एका चिरतरुण तरुणी पेक्षा सुंदर दिसत आहे. त्यांच्या सौंदर्याने चाहत्यांचे लक्ष वेधले.
'पंचायत' वेब सीरिजमध्ये ऑनस्क्रीन कपल असणाऱ्या सचिव आणि रिंकूने सुद्धा रोमँटिक अंदाजात खूप सुंदर फोटोशूट केले आहे. त्यांच्या फोटो पोजेसने चाहत्यांचे लक्ष वेधले. दोघांनाही एकत्र बघून चाहते भलतेच आनंदित झाले.
शेअर केलेल्या फोटोमध्ये सचिव अर्थात जितेंद्र कुमारने स्टायलिश लूक कॅरी केला आहे. तर, साधी सिंपल राहणारी रिंकी अर्थात सान्विकानेही एकदम हटके अंदाज केला आहे. कधीही न पाहिलेल्या अंदाजात सान्विका दिसली.
सिरीजमध्ये अत्यंत साध्या लूकमध्ये राहणारा चंदन रॉय उर्फ विकास सुद्धा या फोटोंमध्ये एकदम स्टायलिश अंदाजात दिसत आहे. शिवाय, वेबसीरिजमध्ये बिनोदची भूमिका साकारणारा अशोक पाठक या फोटोंमध्ये खूपच वेगळा दिसतोय.
‘पंचायत ४’ वेबसीरिजमध्ये बनराकसची भूमिका साकारणारा अभिनेता दुर्गेश कुमार सुद्धा फोटोंमध्ये खूपच वेगळा दिसतोय. या भूमिकेनेच अभिनेत्याला प्रसिद्धी दिली. शिवाय, सीरिजमध्ये बनराकसच्या पत्नीची भूमिका साकारणारी सुनिता राजवर सुद्धा स्टायलिश अंदाजात दिसते.