अभिनेत्री जान्हवी कपूर तिच्या नुकतेच बहुचर्चित असणाऱ्या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्थ होत होती. दरम्यान, त्या चित्रपटाची टीम लालबागच्या राजाच्या दर्शनाला दिसून आली होती. जान्हवी कपूरसह अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राही यावेळी दिसून आला होता. दरम्यान, अभिनेत्रीने काही क्षण तिच्या सोशल मीडियावर शेअर केले आहे.
अभिनेत्रीने शेअर केले बाप्पासोबतचे भक्तिमय क्षण. (फोटो सौजन्य - Social Media)
जान्हवीने तिच्या सोशल मीडियावर बाप्पासह काही क्षण शेअर केले आहेत. हे एकाच ठिकाणचे क्षण नसून काह घरातील तर काही बाहेरील आहेत.
अभिनेत्रीने लालबागच्या राजाच्या दर्शनाचे क्षणही सोशल मीडियावर शेअर केले आहेत. हे क्षण पाहून तिच्या चाहत्यांनी तिला तिच्या नव्या चित्रपटासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
अभिनेत्रीने सुंदर अशी साडी परिधान केली आहे. नाकामध्ये नथ घालून कानात आलिशान झुमके, असा हा साज शृंगार चाहत्यांना फार भावला आहे.
अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये 'गणपती बाप्पा मोरया' असा जयघोष नमूद केला आहे.
तिचे हे लुक चाहत्यांना फार भावले असून, कमेंट्समध्ये कौतुकांवर कौतुक करण्यात आले आहे.