अभिनेत्री जन्नत जुबेरने तिच्या सोशल मीडिया हँडलवर नवीन फोटोशूट शेअर केला आहे. अभिनेत्री विविध कार्यक्रम तसेच रील्सच्या माध्यमातून नेहमीच चाहत्यांच्या चर्चेत असते. तिच्या नवनवीन अदाकारीने मोठ्या प्रमाणात चाहत्यांची फौज तिने गोळा केली आहे. या चाहत्यांनी तर या फोटोशूटसाठी कॉमेंट्सची रांगच लावली आहे.
फोटो सौजन्य - Social Media
अभिनेत्री जन्नत जुबेरने तिच्या सोशल मीडियावर नवीन फोटोशूट शेअर केला आहे. आकर्षणाची झलक या फोटोशूटमध्ये दिसत आहे.
पांढऱ्या रंगाची सुंदर अशी साडी तिने परिधान केली आहे. तिच्या डोळ्यांच्या नशेमध्ये तरुण धुंद झाले आहेत.
अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये 'Forever a saree girl' असे नमूद केले आहे. या फोटोंमध्ये ती फार आकर्षक दिसत आहे.
तिच्या चेहऱ्यावरील ते सुंदर हसणे आणि रुबाब कुणालाही मोहात पाडण्यासारखे आहे.
तिच्या चाहत्यांनी कमेंट्समध्ये अनेक कमेंट्सचा पाऊसच पाडला आहे.