जुईली जोगळेकर म्हणजे मराठी संगीतातील एक प्रसिद्ध आवाज! या आवाजाला मराठीतील रॉकस्टार जरी संबोधले तरी ठीकच! कारण या आवाजाने महाराष्ट्राच्या तरुणांच्या मनावर अधिराज्य केले आहे. हे सुरांचे साम्राज्य इतके विशाल आहे की गायिकेने आता आवाजानेच नाही तर सौंदर्यचि छडी फिरवण्यासही सुरुवात केली आहे.
जुईली जोगळेकरचा हा फोटोशूट पाहिलात का? (फोटो सौजन्य - Social Media)
गायिका जुईली जोगळेकरने तिच्या सोशल मीडियावर एक सुदंर निसर्गरम्य असा फोटोशूट शेअर केला आहे. जो या छायाचित्रांना पाहत आहे तो प्रेमात विसावत आहे.
गायिकेने या पोस्टखाली कॅप्शनमध्ये अगदी सुंदर असा कॅप्शन दिला आहे. कॅप्शनमध्ये लिहिले आहे की,"Just Me , Some shade, and a Pocket of Peace."
तसेच पोस्टखाली कमेंट्समध्ये तिच्या चाहत्यांनी मनाचं पातेलं त्या ठिकाणी ओतलं आहे. त्या पातेल्यात कौतुकाची चांगलीच फोडणी पडली आहे.
झाडाखाली पाणवठ्याच्या शेजारी मंद सावलीत विसावलेली जुईली आणि तिच्या चेहऱ्यावरचे ते भाव... बघाल तर बघत बसाल! नुसते बघत बसणार नाही तर प्रेमातदेखील पडाल!
ते सुंदर स्मित हास्य मनमोहक तर आहेच. मराठी तरुणांना नंतर आता चक्क लंडनच्या तरुणांना घायाळ करण्याची वेळ आलेली दिसून येत आहे.