Kareena Kapoor: करीना कपूर खान कधीच तिच्या फॅन्सना निराश करत नाही. तिचा फॅशन सेन्स कायम ऑन पॉईंट दिसून येतो. अंबानी कुटुंबीयांच्या घरी करिना आणि पती सैफ अली खानने हजेरी लावली होती. यावेळी सब्यासाचीने डिझाईन केलेला गोल्ड आणि लाल रंगाचे समीकरण असणारासलवार सूट तिने निवडला जो पारंपारिक आणि मोहक होता. अत्यंत रॉयल आणि क्लासी असा हा करिनाचा लुक तुम्हीही यावेळी गणपतीच्या उत्सवासाठी करू शकता. नजर टाकूया करिनाच्या क्लासी लुकवर (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
करिनाचा लुक हा क्लासी, लक्झरियास आणि पारंपारिकतेचे उत्तम समीकरण दिसून येत आहे. तर तिच्या सौंदर्याने यामध्ये अधिक भर घातली आहे असं म्हटलं तर अतिशयोक्ती ठरणार नाही
लाल रंगाच्या या ड्रेसमध्ये गोल्डन भरतकाम समाविष्ट होते. करिनाचा हा लुक गणेशोत्सव सणासाठी परफेक्ट लुक असल्याचे दिसून येत आहे, तर सैफनेदेखील तिला मॅचिंग असा धोतर कुरता घातला आहे
बांधणीची गोल्डन आणि लाल पांढऱ्या रंगाची ओढणी करिनाने यासह मॅच केली असून तिचा नवाबी लुक पाहून कोणाचाही नजर हटणार नाही
गोल्डन रंगाचे तिचे हे मोठे कानातले तिच्या सौंदर्यात अधिक भर घालत आहेत. तर तिच्या पारंपरिक लुकला अधिक उठाव आणून देण्यास त्यांची मदत होतेय
बेबोला इंडस्ट्रीमध्ये झालीत २५ वर्षे, करीनाचे 'हे' चित्रपट होणार पुन्हा रिलीज
कपाळावर लाल टिकली लावत तिने हा गणपतीचा पारंपरिक लुक पूर्ण केलाय. सैफची बेगम करिना कपूर अत्यंत सुंदर आणि आकर्षक दिसून येत आहे
बेसिक फाऊंडेशन, हायलायटर, डार्क काजळ, स्मोकी ब्राऊन आयशॅडो, डार्क भुवया आणि न्यूड रंगाची ब्राऊन शेड लिपस्टिक करिनाने लावली आहे, ज्यामध्ये ती खूपच मोहक दिसतेय