Video: दुबईत मिसाईल अटॅकच्या भीतीमध्येही भारतीयांचा हटके अंदाज; भोजपुरी स्टाईलमध्ये तरुणांनी केली कमेंट्री (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, आकाशातून एक आगीचा गोळा म्हणजेच मिसाईल दुबईतील एका इमारतीच्या दिशेने येत आहे. एका कंन्स्ट्रक्शन साईटवर हल्ला झाला आहे. अशा सहसा परिस्थिती घबराटीची असते, लोक जीव मुठीत धरून धावू लागतात. पण व्हिडिओमध्ये काही तरुण मिसाईल पाहून घाबरण्याऐवजी उत्साहात भोजपुरी कमेंट्री करत आहेत. एक तरुण म्हणतोय देखा उधर गिरल हौ म्हणजे बघ तिथे पडलंय ते, तर दुसरा तरुण अरे भाऊ, सीधा नीचे आ रहल बा म्हणजे अरे भावा, ते थेट खालीच येतंय असे म्हणत आहे. त्यांच्या या मजेशीर कमेंट्रीमुळे भीतीदायक परिस्थिती एका विनोदी प्रसंगात रुपांतरित झाली आहे.
व्हायरल व्हिडिओ
Dubai में काली कमाई वाला अमीर भारतीय सब मोदी जी से जान बचाने की अपील कर रहा है, बिहार और पूर्वांचल वाला लेबर सब दुबई में मौज ले रहा है
और भोजपुरी में कमेंट्री कर रहा है, भोजपुरिया अलग ही माटी का होता है, pic.twitter.com/KNMG63je3j — ANIL (@AnilYadavmedia1) March 1, 2026
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ हा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @AnilYadavmedia1 या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत हजारो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहेत. अनेकांनी हा व्हिडिओ पाहून कपाळावर हात मारुन घेतला आहे. तर काहींनी संताप व्यक्त केला आहे. एका तरुणाने भारतीय माणूस जगात कुठेही गेला तरी आपला गावरान स्वॅग काय सोडत नाही असे म्हटले आहे, तर एकाने मिसाईल डोक्यावर पडली तर समजेल असे म्हटले आहे. सध्या हा व्हिडिओ नेमका कुठे आणि कधीचा आहे, मिसाईल अटॅकचाच आहे याची पुष्टी झालेली नाही. पण या व्हिडिओने सोशल मीडियावर प्रचंड धुमाकूळ घातला आहे.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






