चित्रपट वेलकम होम (२०२०) हा एक सायकोलॉजिकल थ्रिलर आहे, जो महाराष्ट्रातील नागपूरमधील एका खऱ्या घटनेवर आधारित आहे. चित्रपट हिट चित्रपटासारख्या मोठ्या प्रेक्षक वर्गापर्यंत अद्याप पोहचला नाही. परंतु, चित्रपट फार मोठा चर्चेचा विषय ठरला होता. चित्रपट २०२० साली प्रदर्शित करण्यात आला आहे. चित्रपट हॉरर आणि रहस्यमयी आहे.
चित्रपट वेलकम होम २०२० साली प्रदर्शित करण्यात आला. (फोटो सौजन्य - Social Media)
या चित्रपटात घरगुती हिंसा, मानसिक आघात यांसारख्या कठीण विषयांना स्पर्श करण्यात आला आहे, जिथे दोन महिला एका खतरनाक कुटुंबासोबत ग्रामीण भागात एका घरात अडकलेल्या आहेत.
कश्मीरा ईराणी आणि स्वार्दा थिगळे यांच्या भूमिकांमध्ये या महिलांच्या संघर्षाचे दृश्य दाखवण्यात आले आहे.
पुष्कर महाबळ यांच्या दिग्दर्शनात या चित्रपटातील भितीदायक दृश्यांची निर्मिती, क्लॉस्ट्रोफोबियाचा अनुभव देणारी वातावरणनिर्मिती करण्यात आली आहे.
चित्रपटात धक्कादायक आणि अस्वस्थ करणारी दृश्यं आहेत, ज्यामुळे हे प्रेक्षकांच्या संवेदनांना स्पर्श करणारे आहे. काही प्रेक्षकांसाठी हा चित्रपट पाहण्यास योग्य नाही.
अभिनयाबद्दल चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळाला, विशेषतः यात दाखवलेल्या शारीरिक व मानसिक संघर्षावर प्रभावीपणे प्रकाश टाकल्याबद्दल चित्रपट फार चर्चेत आला होता.