सध्याच्या काळात स्मार्टफोन आपल्या जीवनाचा महत्त्वाचा भाग बनला आहे. त्यामुळे आपल्याकडे लेटेस्ट आणि उत्तम स्मार्टफोन असावा असं प्रत्येकाला वाटतं. सहसा लोकं ऑनलाईन सेलमधून लेटेस्ट स्मार्टफोन खरेदी करण्याला प्राधान्य देतात. कारण सेलमध्ये कमी किंमतीत आणि ऑफर्ससह लेटेस्ट स्मार्टफोन खरेदी करण्याची संधी असते. तुम्ही देखील सेलमधून स्मार्टफोन खरेदी करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. ऑनलाईन स्मार्टफोन खरेदी केल्यानंतर डिलीव्हरीवेळी काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
ऑनलाईन सेलमध्ये नवीन स्मार्टफोन खरेदी केलाय? डिलीव्हरीवेळी लक्षात ठेवा या महत्त्वाच्या गोष्टी, नाहीतर होईल मोठं नुकसान
अनेक प्लॅटफॉर्म ओपन-बॉक्स डिलिव्हरी देतात. त्यामुळे ग्राहक डिलीव्हरी स्विकारण्यापूर्वी बॉक्समधील प्रोडक्ट तपासू शकतात.
बॉक्स उघडल्याशिवाय आणि त्यातील प्रोडक्टची पूर्णपणे तपासणी केल्याशिवाय कधीही डिलिव्हरी कोड शेअर करू नका.
प्रोडक्ट खरेदी करताना, सील पूर्णपणे व्यवस्थित असल्याची खात्री करा. जर बॉक्स सील तुटलेले दिसले किंवा पॅकेजिंगमध्ये काही गडबड आढळल्या तर ताबडतोब डिलिव्हरी नाकारा.
बॉक्स तुमच्या समोर उघडला जात असला किंवा तुम्ही तो स्वतः अनबॉक्स करत असलात तरी, संपूर्ण प्रक्रिया व्हिडिओमध्ये कैद करा.
जर तुम्ही असा प्लॅटफॉर्म निवडला असेल जो ओपन-बॉक्स डिलिव्हरी देत नाही, तर उत्पादन मिळाल्यावर ते अनबॉक्स करतानाचा व्हिडिओ नक्की घ्या.