Visa free countries for Indian: परदेशात जाव असं आपल्या प्रत्येकाचं स्वप्न असतं. पण काहींचं हे स्वप्न पूर्ण होत नाही. याचं कारण म्हणजे परदेशात जाण्यासाठी लागणारा व्हिसा. तुम्ही देखील तुमची परदेशची ट्रीप व्हिसामुळे रद्द केली असेल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. 2025 मध्ये तुम्ही 6 परदेशी देशांना व्हिसाशिवाय भेट देऊ शकता. असे काही देश आहेत जे भारतीयांना व्हिसाशिवाय प्रवेश देतात. त्यामुळे आता परदेशात जायचं आहे आणि व्हिसा नाही, या सर्वाची चिंता करण्याची गरज नाही. आता तुम्हाला परदेशात जाण्यासाठी केवळ तिकीट बुक करण्याची गरज आहे. चला तर मग अशा या देशांची यादी पाहूया, जिथे भारतीयांना व्हिसाविना प्रवेश मिळणार आहे. (फोटो सौजन्य – pinterest)
परदेशात जायचं पण व्हिसाचं टेंशन? 2025 मध्ये या 6 देशांत व्हिसाविना होणार भारतीयांचा प्रवास
भारतीय नागरिकांना भूतानमध्ये प्रवेश करण्यासाठी व्हिसा आणि पासपोर्टची आवश्यकता नाही. भारतीय नागरिक मतदार कार्डाच्या मदतीनेच येथे प्रवेश करू शकतात.
भारतीय नागरिकांना 60 दिवसांपर्यंत मॉरिशसमध्ये व्हिसामुक्त प्रवास करण्याची परवानगी सरकारतर्फे देण्यात आली आहे.
नेपाळमध्ये भारतीय नागरिकांसाठी व्हिसा मुक्त प्रवेश सुविधा उपलब्ध आहे. या ठिकाणी तुम्ही नवीन पर्यटनस्थळ एक्सप्लोअर करू शकता.
भारतीय नागरिक 30 दिवसांपर्यंत सिंगापूरमध्ये व्हिसामुक्त प्रवास करू शकतात. गार्डन बाय द बे, युनिव्हर्सल स्टुडिओ, अशी येथील प्रमुख पर्यटन स्थळे आहेत.
भारतीय नागरिक हाँगकाँगला देखील व्हिसाशिवाय भेट देऊ शकतात. येथील कालावधी 14 दिवसांचा आहे. डिजनीलँडला देखील भेट देऊ शकता.
भारतीय नागरिकांसाठी जॉर्डनमध्ये 30 दिवसांपर्यंत ऑन अरायव्हल व्हिसा उपलब्ध आहे.