धर्म बदलून घेतली होती कुराणवर शपथ; Joharan Mamdani पूर्वी 'या' नेत्याने रचला इतिहास (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
भारतीय वंशाचे जोहरान ममदानी यांच्या कुराणवर शपथ घेण्याची चर्चा र्वत्र सुरु आहे. ते केवळ न्यूयॉर्क शहराचे महापौर म्हणून नव्हे तर, पहिले भारतीय वंशाचे मुस्लिम महापौर ठरले आहे. परंतु त्यांच्यापूर्वी कीथ एलिसन यांनी कुराणवर हाथ ठेवून शपथ घेतली होती.
कीथ एलिसन हे मिनेसोटाचे डेमोक्रॅटिक कॉंग्रेसचे सदस्य होणते. त्यांनी कुराणवर शपथ घेऊन अमेरिकेतील पहिले मुस्लिम कॉंग्रेसमन म्हणून इतिहास रचल होता. परंतु त्यांनी ख्रिश्चन धर्मातून परिवर्तन करुन त्यांनी इस्लाम धर्म स्वीकारला होता. परंतु त्यांनी ज्या कुराणवर थपथ घेतली ते मूळ अरेबी भाषेथ लिहिलेले कुराण नव्हते. कीथ एलिसन यांनी इंग्रजी कुराणवर शपथ घेतली होती. यामुळे त्या काळी मोठा वाद निर्माण झाला होता. त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका केली होती. कीथ एलिसन यांनी मुस्लिम धर्म स्वीकारण्यामागचे कारण म्हणचे ते अमेरिकेच्या विविध संस्कृती आणि ज्ञान परंपरा स्वीकारण्याच्या धोणावर त्यांना अतिशय विश्वास होता.
कीथ एलिसन यांची शपथ अत्यंत विशेष मानली जात होती. कारण त्यांनी अमेरिकेचे तिसरे राष्ट्राध्यक्ष थॉमस जेफरसन यांच्या वैयक्तिक कुराणवर शपथ घेतली होती. १९९४ मध्ये लंडनमध्ये इंग्रजीत मूळ कुराणचे भाषांतर करण्यात आले होते. याची पहिली प्रत ही अमेरिकेचे तिसरे राष्ट्राध्यक्ष थॉमस जेफरसन यांनी विकत घेतली होती. या कुराणला एका विशेष बॉक्समध्ये ठेवण्यात आले होते.
परंतु अमेरिकेच्या राजकारणात कीथ एलिसन यांच्या कुराणवर शपथ घेण्याच्या चर्चेपेक्षा जोहरान ममदानी यांची शपथ अधिक चर्चेची ठरली आहे. पहिले मुख्य कारण म्हणजे ममदानी हे भारतीय वंशाचे मुस्लिम नेते आहे. तसेच न्यूयॉर्कमध्ये ख्रिश्चन बहुललोसंख्या असाताना त्यांची निवड झाली आहे. ही दक्षिण आशियातील मुस्लिम समुदायासाठी मोठी कामगिरी मानली जात आहे. त्यांनी नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी महापौरपदाची शपथ घेतली आहे. यावेळी त्यांच्या पत्नी कुराण हातता घेऊन उभ्या होत्या.
भारतीय वंशाचे ममदानी यांनी न्यूयॉर्कमध्ये उडवला विजयी गुलाल; बनले पहिले मुस्लिम महापौर






