टीव्ही अभिनेत्री दीपिका कक्करला स्टेज ३ लिव्हर कॅन्सर झाला आहे. तिने ही माहिती इंस्टाग्राम पोस्टद्वारे शेअर केली. तिने सांगितले की, पोटदुखीमुळे ती रुग्णालयात गेली होती, त्यानंतर तिला तिच्या लिव्हरमध्ये ट्यूमर असल्याचे कळले. पोट सतत दुखत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करणे तुम्हाला नक्कीच त्रासदायक ठरू शकते. सध्या अनेकांना कॅन्सरने ग्रासले आहे. आपल्या राहणीमानाच्या पद्धतीमुळे कॅन्सरसारखे गंभीर आजार उद्भवतात आणि लिव्हर कॅन्सरची लक्षणे नक्की काय आहेत आपण जाणून घेऊया (फोटो सौजन्य - iStock)
काही कॅन्सर असे आहेत ज्यांचे संकेत पटकन कळून येत नाहीत आणि त्यापैकीच एक म्हणजे लिव्हर कॅन्सर. सतत पोटात दुखत असेल तर दुर्लक्ष करू नका
लिव्हर कॅन्सरचे एक सामान्य लक्षण म्हणजे वजन कमी होणे. परंतु अनेकदा लोक त्याकडे लक्ष देत नाहीत. या स्थितीत रुग्णांना भूक कमी लागते, लवकर पोट भरते आणि कोणत्याही कारणाशिवाय वजन कमी होऊ लागते
यकृताच्या कर्करोगाने ग्रस्त असलेले लोक पोटात वेदना किंवा अस्वस्थतेची तक्रार करतात. त्यांना पोटाच्या वरच्या उजव्या भागात वेदना किंवा अस्वस्थता असते. यकृत या ठिकाणी स्थित असते आणि ट्यूमरचा आकार वाढल्यामुळे वेदना जाणवू शकतात
भूक न लागणे हेदेखील लिव्हरच्या कॅन्सरचे एक लक्षण आहे. यकृत खराब झाले की भूकेची समस्या उद्भवते. यासोबतच पोट फुगते, खाण्याची इच्छा कमी होते
कावीळ हे लिव्हर निकामी होण्याचे देखील एक लक्षण आहे. यकृत निकामी झाल्यास कावीळ होतो कारण ट्यूमर पोटाच्या नलिकेत अडथळा आणतो, ज्यामुळे यकृत योग्यरित्या कार्य करू शकत नाही
वरील लक्षणे दिसून आल्यास तुम्ही त्याकडे दुर्लक्ष करू नयेत आणि वयाच्या ३० नंतर नियमितपणे विशेषतः महिलांनी कॅन्सरच्या टेस्ट करून घ्याव्यात