अभिनेत्री माधुरी दीक्षितने ८० च्या दशकातील तसेच ९० च्या दशकातील तरुणांना घायाळ तर केलेच आहे तसेच तिच्या सौंदर्याची जादू आजच्या तरुणांवरही दिसून येत आहे. माधुरी तिच्या सोशल मीडिया हॅण्डलवरून नेहमी तिच्या चाहत्यांशी जोडलेली असते. तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून तिचे चाहते तिला उत्स्फूर्त प्रतिसाद देत असतात.
माधुरी दीक्षितने शेअर केला तिचा नवा अंदाज. (फोटो सौजन्य - Social Media)
अभिनेत्री माधुरी दीक्षितने तिच्या @madhuridixitnene या सोशल मीडिया हँडलवर काही फोटोज शेअर केले आहेत. फोटोज फार गाजत आहेत.
तारुण्य कसे असावे? याची उत्तम व्याख्या देत माधुरीने इन्स्टाग्रामवर कहरच केला आहे. साडीवरील नक्षीकाम फार आकर्षक आहेत.
मुळात, फोटोशूटचे बॅकग्राउंड जरा हटके आहे. मागे मोठा ग्रँड पियानो ठेवला आहे. मोकळ्या केसात आणि भारतीय पेहरावात माधुरी फार आकर्षक दिसत आहे.
पोस्टखाली चाहत्यांनी उत्तम प्रतिसाद दिला आहे. नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. तिचे सौंदर्य पाहून तरुण घायाळ झाले आहेत.
'मॅम, तुम्ही किती सुंदर आहात.' 'मॅम, तुमची स्माईल इतकी गोड कशी?' असे अनेक कॉमेंटस पोस्टखाली आले आहेत.