मागील काही दिवसांपासून प्रयागराज येथे महाकुंभ मेळा 2025 ला सुरुवात झाली आहे. हा देशातील सर्वात धार्मिक सोहळा आहे, ज्यासाठी जगभरातून करोडोंच्या संख्येने भाविक प्रयागराजमध्ये येत असतात. या महाकुंभमेळ्याचे प्रमुख आकर्षण म्हणजे यात सामील होणारे नागा साधू! संपूर्ण शरीराला भस्म लावलेले आणि निर्वस्त्र होऊन मोह मायेचा त्याग केलेल्या नागा साधूंचे जीवन वाटते तितके सोपे नसते. नागा साधूंची ओळख म्हणजे त्यांचे लांब, जटाधारी केस. आता या केसांबाबत त्यांना कोणत्या नियमांचे पालन करावे लागते याबाबत काही रंजक गोष्टी जाणून घेऊयात.
Mahakumbh 2025: नागा साधू केस कापू शकतात का? काय सांगतात नियम
नागा साधूंचे जीवन फार कठीण आणि खडतर असते. गळ्यात रिद्राक्षांची माळ, शरीरावर भस्म आणि जटाधारी केस ही त्यांची प्रमुख ओळख आहे. नागा साधूंचे जटाधारी केस हे जवळपास 10 फूट लांब असू शकतात.
नागा साधू आपल्या केसांना वाळू आणि राख लावतात. तर नागा साधू आपले केस कापू शकतात की नाही या प्रश्नाचे उत्तर 'नाही' असे आहे. नागा साधूंना लांब जटा ठेवाव्या लागतात आणि त्या कापता येत नाहीत
नागा साधूंच्या लांब केसांचा संबंध हा त्यांच्या आध्यात्मिकता, ध्यान, आणि तपस्येशी आहे. नागा साधूंच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या जटा मेंदूमध्ये अधिक ऊर्जा खेचतात आणि केसांमधून वैश्विक ऊर्जा वाहण्याचे काम करतात, ज्यामुळे नागा साधू लांब जटा ठेवण्यावर विश्वास ठेवतात
नागा साधू आपल्या जटा साफ करण्यासाठी किंवा धुण्यासाठी कोणत्याही साबणाचा किंवा शॅम्पूचा वापर करत नाहीत तर ते यासाठी भस्माचा वापर करतात
नागा साधू फक्त आपल्या गुरूंच्या मृत्यूवेळी आपल्या जटा/केस कापू शकतात. आपल्या गुरूंच्या सन्मानाखातर त्यांचे सर्व शिष्य आपल्या केसांचा त्याग करतात