आजच्या ताज्या बातम्या वाचा एका क्लिकवर
30 Sep 2025 10:59 AM (IST)
पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हारिस रौफ पुन्हा एकदा वादात सापडला आहे. आशिया कप २०२५ च्या अंतिम सामन्यात भारतीय फलंदाज अभिषेक शर्माला झेलल्यानंतर, रौफने विमान अपघातासारखा आनंद साजरा केला, ज्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, काही दिवसांपूर्वीच, भारताविरुद्धच्या सुपर फोर सामन्यादरम्यान अशाच प्रकारचा आनंद साजरा केल्याबद्दल आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) त्याला दंड ठोठावला होता. त्यामुळे, जर त्याने पुन्हा असेच कृत्य केले तर त्याला ICC च्या रोषाला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.
30 Sep 2025 10:51 AM (IST)
सोशल मीडिया किंग, प्रसिद्ध अभिनेता आणि भाडिपाचा सर्वेसर्वा सारंग साठ्येनं चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. सारंगने पॉलाबरोबर अखेर लग्न करून चाहत्यांना खुश करून टाकले आहे. सारंग आणि पॉला गेली १२ वर्ष लिव्ह इनमध्ये एकत्र राहत होते. दोघांनी आम्ही लग्न करणार नाही असं ठरवलं होतं पण अचानक त्यांनी लग्न करून सगळ्यांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. त्याला चाहत्यांसह त्याचे मित्र-मैत्रिणींनी देखील अभिनंदन करत आहे. प्रत्येक फोटोवर चाहत्यांच्या कंमेंटचा वर्षाव होत आहे.
30 Sep 2025 10:40 AM (IST)
“माझ्या एका निर्णयामुळे एक शक्तीशाली आयात लॉबी नाराज झाली झाली असून माझी बदनामी करण्यासाठी हे सर्व षडयंत्र रचले जात आहे. कच्च्या तेलाच्या आयातीमुळे देशातून जवळपास २२ लाख कोटी रुपये बाहेर जात होते. या निर्णयामुळे काहींच्या व्यवसायावर परिणाम झाला असून, त्यामुळे ते नाराजीने बदनामी करण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र मी आजवर कुठल्याही ठेकेदाराकडून एक पैसाही घेतलेला नाही. त्यामुळेच ठेकेदार मला घाबरत आहेत, अशा शब्दांत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी त्यांच्यावरील आरोपांवर उत्तर दिले आहे.
30 Sep 2025 10:25 AM (IST)
दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियातील टी-२० मालिकेत त्यांना पराभूत केले. ऑस्ट्रेलिया आता ऑक्टोबरमध्ये न्यूझीलंड आणि टीम इंडियाविरुद्ध टी-२० मालिका खेळणार आहे. २०२६ च्या टी-२० विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर या दोन्ही मालिका महत्त्वाच्या असतील. या मालिकेपूर्वी संघाला मोठा धक्का बसला आहे. सामना जिंकणारा अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेल दुखापतग्रस्त झाला आहे.
30 Sep 2025 10:17 AM (IST)
आयसीसी महिला एकदिवसीय विश्वचषक 2025 ला आज शुभारंभ होणार आहे. आज स्पर्धेचा पहिला सामना खेळवला जाणार आहे. हा सामना भारत आणि श्रीलंका या दोन देशांमध्ये खेळवला जाणार आहे. भारताच्या महिला संघाला आतापर्यत एकदाही आयसीसी एकदिवसीय विश्वचषकाची ट्राॅफी हाती लागली नाही. महिला एकदिवसीय विश्वचषकाच्या अंतिम फेरीत दोनदा पोहोचलेला परंतु विजेतेपद जिंकण्यात अपयशी ठरलेला भारतीय महिला संघ यावेळी इतिहास रचण्याच्या उद्देशाने मैदानात उतरेल.
30 Sep 2025 10:07 AM (IST)
म्हसवड शहरात शनिवारी पहाटे झालेल्या मुसळधार पावसाने म्हसवड एस. टी. बस स्थानक ते शिंगणापुर चौक या दरम्यान असलेल्या अनेक दुकानांमध्ये पाणी शिरल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले. या नुकसानीची पाहणी करताना जिल्ह्याचे पालकमंत्री शंभुराज देसाई यांनी नुकसानग्रस्तांशी संवाद साधताना शासकीय मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले. तर ज्या घरांची पडझड झाली, त्या घरांचे पंचनामे करण्याचे आदेश देत संबधितांना सर्वोतोपरी सहकार्य करण्याचे प्रशासनाला आदेश दिले.
30 Sep 2025 09:55 AM (IST)
नेपाळ विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यामध्ये तीन सामन्यांची टी20 मालिका खेळवली जात आहे. या मालिकेमध्ये नेपाळच्या संघाने पहिल्या दोन्ही सामन्यामध्ये कमालीची कामगिरी केली आणि संघाला दोन्ही सामन्यात विजय मिळवून देऊन मालिका नावावर केली आहे. या मालिकेचा तिसरा आणि शेवटचा सामना अजूनही शिल्लक आहे, या दोन्ही सामन्यामध्ये नेपाळच्या संघाने विजय मिळवून टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खळबळ उडवून दिली आहे. त्यांनी या मालिकेत दोन वेळा विश्वचषक जिंकणाऱ्या वेस्ट इंडिज संघाला दारुण पराभव पत्करावा लागला.
30 Sep 2025 09:45 AM (IST)
निकोल किडमन आणि कीथ अर्बन एका उन्हाळ्यासाठी वेगळे राहत होते. असे वृत्त आहे की निकोल किडमन वेगळे होऊ इच्छित नव्हते. वेगळे होण्याचे कारण अज्ञात आहे. किडमन आणि अर्बन दोघेही ऑस्ट्रेलियामध्ये वाढले आणि गेल्या काही दशकांपासून त्यांच्या आयुष्यात चढ-उतार आले आहेत. आणि त्यामुळे या दोघांनी हा निर्णय घेतला असल्याचे शक्यता आहे. त्यांना दोन मुले आहेत, संडे रोझ, वय १७ आणि फेथ मार्गारेट, वय १४. किडमन यांना टॉम क्रूझपासून दोन दत्तक मुले देखील आहेत. निकोल किडमन आणि कीथ अर्बन यांची २००५ मध्ये भेट झाली आणि २५ जून २००६ रोजी ऑस्ट्रेलियामध्ये लग्न झाले.
30 Sep 2025 09:39 AM (IST)
अकोल्यातून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. बाप लेकीच्या नात्याला काळिमा फासणारी ही घटना आहे. एका नराधम सावत्र बापाने आपल्या मुलीवरच लैंगिक अत्याचार केल्याचे समोर आले आहे. या नराधमाला अटक करण्यात आली असून आहे. चिमुकीली हि केवळ पाच वर्षांची आहे असून तिच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहे. सद्यस्थितीत मुलीची प्रकृती स्थिर आहे.
30 Sep 2025 09:18 AM (IST)
कवठेएकंद (ता. तासगाव) येथे रविवारी दुपारी झालेल्या भीषण स्फोटानंतर गावात खळबळ उडाली होती. विश्वकर्मा पांचाळ समाज मंदिरामध्ये बेकायदेशीररीत्या साठवून ठेवलेल्या शोभेच्या दारूचा स्फोट झाला. या दुर्घटनेत आठजण जखमी झाले असून, त्यापैकी दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. याप्रकरणी सात जणांविरुद्ध तासगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
30 Sep 2025 09:10 AM (IST)
नवी मुंबई येथील करावे गावातून एक धक्कदायक हत्येची बातमी समोर आली आहे. एका व्यक्तीने चारित्र्याच्या संशयावरून आपल्या पत्नीची निर्घृणपणे हत्या केल्याचे प्रकार उघडकीस आले आहे. आरोपीला पोलिसांनी अटक केली असून एनआरआय पोलीस या प्रकरणाची अधिक चौकशी करत आहे. मात्र, या घट्नेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
30 Sep 2025 09:04 AM (IST)
आयसीसी महिला एकदिवसीय विश्वचषक 2025 ला आज शुभारंभ होणार आहे. आज स्पर्धेचा पहिला सामना खेळवला जाणार आहे. हा सामना भारत आणि श्रीलंका या दोन देशांमध्ये खेळवला जाणार आहे. भारताच्या महिला संघाला आतापर्यत एकदाही आयसीसी एकदिवसीय विश्वचषकाची ट्राॅफी हाती लागली नाही. महिला एकदिवसीय विश्वचषकाच्या अंतिम फेरीत दोनदा पोहोचलेला परंतु विजेतेपद जिंकण्यात अपयशी ठरलेला भारतीय महिला संघ यावेळी इतिहास रचण्याच्या उद्देशाने मैदानात उतरेल.
Marathi Breaking Live Updates : भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी सोमवारी कॅनडाच्या परराष्ट्र मंत्री अनिता आनंद यांची भेट घेतली. दिल्ली आणि ओटावाच्या माध्यमातून उच्चायुक्तांच्या नियुक्तीला दोन्ही देशांमधील संबंध सुधारण्यासाठी एक स्वागतयोग्य पाऊल म्हणून वर्णन केले.
जयशंकर यांनी ‘एक्स’वर याबाबत पोस्ट करून याबाबत माहिती दिली. त्यांनी ‘न्यूयॉर्कमध्ये कॅनडाच्या परराष्ट्र मंत्री अनिता आनंद यांच्याशी चांगली बैठक झाली. दोन्ही देशांतील संबंध पुन्हा निर्माण करताना उच्चायुक्तांच्या नियुक्तीचे स्वागत आहे. या संदर्भात आम्ही पुढील पावलांवर चर्चा केली. मंत्री अनिता आनंद यांचे भारतात स्वागत करण्यास आम्ही उत्सुक आहोत’.
ऑगस्टमध्ये, भारताने दिनेश पटनायक यांची कॅनडामधील भारताच्या पुढील उच्चायुक्त म्हणून नियुक्ती जाहीर केली. गेल्या आठवड्यात पटनायक यांनी कॅनडाच्या गव्हर्नर जनरल मेरी सायमन यांना त्यांची पत्रे सादर केली. त्यानंतर आता ते त्यांच्या पदभार स्वीकारताना दिसत आहे.