अकोला : अकोल्यातून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. बाप लेकीच्या नात्याला काळिमा फासणारी ही घटना आहे. एका नराधम सावत्र बापाने आपल्या मुलीवरच लैंगिक अत्याचार केल्याचे समोर आले आहे. या नराधमाला अटक करण्यात आली असून आहे. चिमुकीली हि केवळ पाच वर्षांची आहे असून तिच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहे. सद्यस्थितीत मुलीची प्रकृती स्थिर आहे.
आई गरबा खेळण्यासाठी गेली होती
हा गंभीर प्रकार समोर येताच काही तासातच खदान पोलीसांकडून नराधमाला अटक करण्यात आली. ही घटना तेव्हा घडली जेव्हा चिमुकलीचे आई गरबा खेळण्यासाठी बाहेर गेली होती. याचीच संधी साधून सावत्र बापाने आपल्या पाच वर्षाची चिमुकलीवर अत्याचार केला. मुलीचे पोट जास्त दुखू लागल्याने तिने आई घरी परतल्यानंतर सर्व प्रकार सांगितला. आईने तातडीने रुग्णालयात दाखल केला असता हा संपूर्ण प्रकार समोर आलाय.
अकोल्यात पुन्हा एक धक्कादायक प्रकार, मूकबधिर मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न
अकोल्यातून एक धक्कदायक प्रकार समोर आला आहे. शेजाऱ्याने एका मूकबधिर मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला असल्याचे उघड झाले आहे. ही घटना अकोला शहरातील मोठी उमरी येथील परिसरातील १० सप्टेंबर रोजी घडलेल्या या घटनेने शहर हादरून गेले आहे.
नेमकं काय घडलं?
अकोला शहरातील मोठी उमरी येथील परिसरात एक संतापजनक घटना समोर आली आहे. सिव्हिल लाईन पोलीस स्टेशन हद्दीत राहणार नितीन रामकृष्ण खंडारे (वय 38) याने शेजारी राहणाऱ्या एका मूकबधिर मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला असल्याचे उघड झाले आहे.
घटनेच्या रात्री आरोपी खंडारे हा मुलीच्या घरात शिरला. त्यावेळी मुलगी आणि तिची आई गाढ झोपेत होत्या. आरोपीने पीडित मुलीच्या तोंडावर रुमाल दाबला, घराचा दरवाजा व खिडक्या बंद करून घेतल्या आणि तिचा गळा आवळला. त्यामुळे मुलीचा श्वास गुदमरून लागला. भीतीने घाबरलेल्या मुलीने धैर्य दाखवत तोंडावरील रुमाल दूर फेकला आणि दरवाजा उघडून घराबाहेर पळ काढला. आरोपी देखील त्याचवेळी पसार झाला.
शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीच्या आमिषाने तरुणाची फसवणूक; तब्बल ‘इतक्या’ लाखांना घातला गंडा