नवी मुंबई: नवीमुंबई येथील करावे गावातून एक धक्कदायक हत्येची बातमी समोर आली आहे. एका व्यक्तीने चारित्र्याच्या संशयावरून आपल्या पत्नीची निर्घृणपणे हत्या केल्याचे प्रकार उघडकीस आले आहे. आरोपीला पोलिसांनी अटक केली असून एनआरआय पोलीस या प्रकरणाची अधिक चौकशी करत आहे. मात्र या घट्नेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
जीव इतका स्वस्त? घरात आई बाबा असताना डॉक्टर 21 व्या मजल्यावर गेला अन्…; नेमके घडले काय?
नेमकं काय घडलं ?
मिळालेल्या माहितीनुसार, हत्या झालेल्या पत्नीचे नाव ज्योती काकडे असे आहे. तर आरोपीचे नाव राजू काकडे असे आहे. त्यांना दोन मुले देखील आहेत. ते दोन मुलांच्या समवेत करावे गावात राहात होते. राजू हा व्यसनी असून मिळेल ते काम करून उदरनिर्वाह करीत होता. मात्र गेल्या काही महिन्यापासून तो बहुतांश वेळेस मूळ गाव असणाऱ्या बुलढाणा येथे राहत होता. तो १५ दिवसांपूर्वी करावे गावात आला होता. तेव्हापासून पती पत्नीमध्ये वाद सुरु होते.
हाच वाद इतका विकोपाला की राजूने संतापाच्या भरात ज्योतीची हत्या केली. त्याने स्वयंपाक घरातील सूरी घेऊन रागाच्या भरात पत्नी ज्योतीच्या पायावर पोटावर, छातीवर सपासप वार केले. यात ती गंभीर जखमी झाली. तिला उशिरा उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता या हल्ल्यात अति रक्तस्त्राव झाल्याने तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी पोलिसांना सांगितले. सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून पुढील कायदेशीर कारवाई सुरु आहे.
डोक्यावर वार, गळ्यावर धारदार हल्ला; नवी मुंबईत १७ वर्षीय तरुणीचा काकानेच केली हत्या
नवीन पनवेल येथून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. घरगुती वादातून अल्पवयीन मुलीची हत्या झाल्याची धक्कदायक घटना समोर आली आहे. १७ वर्षीय मुलीच्या डोक्यात, चेहऱ्यावर, डोळ्यावर आणि डोळ्याच्या आजूबाजूला वजनदार वस्तूने मारहाण करून तिच्या गळ्यावर धारदार शास्त्राने वार करून हत्या केल्याचे समोर आले आहे. ही हत्या दुसरं तिसरं कोणी नाही तर तिच्या काकानेच केली आहे. ही घटना १९ सप्टेंबर रोजी सकाळी साडेनऊ ते सायंकाळी पाचच्या दरम्यान तळोजा येथे घडली आहे.
तळोजा पोलिसांना याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांचे पथक त्या ठिकाणी रवाना झाले. पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला असून नवी मुंबईतील तळोजामध्ये घरगुती वादातून १७ वर्षीय अल्पवयीन मुलीची घरात घुसून हत्या झाल्याची धक्कदायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणात पोलिसांनी मुलीच्या काकाला अटक केली आहे.
शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीच्या आमिषाने तरुणाची फसवणूक; तब्बल ‘इतक्या’ लाखांना घातला गंडा