वटपौर्णिमा सणाला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. या सणाला महिला सुंदर सुंदर साड्या खरेदी करतात. तसेच वडाची पूजा करण्यासाठी साडी नेसून छान दागिने घालून तयार होतात. सर्वच महिलांकडे अनेक वेगवेगळ्या पार्टन, फॅब्रिक आणि रंगाचे कॅबिनेशन असलेल्या साड्या पाहायला मिळतात. त्यामुळे सणाच्या दिवशी नेमकी कशी साडी घ्यावी? हे बऱ्याचदा सुचत नाही. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला वटपौर्णिमेच्या दिवशी कोणत्या पॅटर्नच्या साड्या नेसल्या पाहिजेत, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. या साड्या अंगावर अतिशय सुंदर आणि उठावदार दिसतात. (फोटो सौजन्य – pinterest)
वटपौर्णिमेच्या पूजेला नेसा या पॅर्टनच्या सुंदर साड्या
सर्वच महिलांना पैठणी साडी नेसायला खूप आवडतात. पैठणी साडीमध्ये सुद्धा अनेक वेगवेगळे प्रकार उपलब्ध आहेत. मोराची डिझाईन असलेली पैठणी, जरीची बॉर्डर असलेली साडी इत्यादी अनेक वेगवेगळे प्रकार पैठणी साडीमध्ये उपलब्ध आहेत.
हल्ली सोशल मीडियावर माहेश्वरी साडीची खूप जास्त क्रेज आहे. ही साडी अंगावर अतिशय चापून चोपून बसते. याशिवाय या साडीमध्ये अनेक वेगवेगळे रंग सुद्धा उपलब्ध आहेत. बारीक गोल्डन असलेली सुंदर माहेश्वरी साडी तुम्ही वटपौर्णिमेला नेसू शकता.
कांजीवरम सिल्क साडी सगळ्यांचं नेसायला खूप आवडते. कारण सिल्क फॅब्रिकमध्ये असलेली सुंदर साडी कोणत्याही सणावाराच्या दिवसांमध्ये अतिशय उठावदार दिसते. या साडीचा काठ असतो.
लग्नसमारंभात नेसली जाणारी बनारसी साडी तुम्ही लग्नानंतरच्या पहिल्या वटपौर्णिमा सणाला नेसू शकता. ही साडी नेसल्यानंतर खूप स्टयलिश आणि हटके लुक येतो.
गर्मीच्या दिवसांमध्ये तुम्हाला जर हलकी साडी नेसायची असेल तर तुम्ही ऑर्गेन्झा साडी नेसू शकता. या साडीच्या काठावर किंवा पदरावर तुम्ही रेशमी घाग्यांचा वापर करून सुंदर नक्षीकाम करू शकता.