अभिनेत्री मानसी नाईक ही तिच्या अभिनय आणि नृत्य कौशल्यामुळे प्रेक्षकांमध्ये खूप लोकप्रिय आहे. परंतु आता तिची चर्चा ही वेगळ्या कारणामुळे होत आहे. हे कारण म्हणजे तिने नुकतेच नऊवारी परिधान करून शूट केलेले काही फोटोज चाहत्यांना घायाळ करत आहे. मानसीने हे फोटोज तिच्या इन्स्टा अकाउंटवर शेअर केले आहे. तिच्या या पोस्टवर काही वेळातच चाहत्यांनी लाइक्स, कमेंट, आणि शेअर्सचा पाऊस पाडला आहे.
एक लाजरा न् साजरा मुखडा चंद्रावानी खुलला गं... मानसी नाईकचा अंदाज पाहून तुम्हीही व्हाल घायाळ
अभिनेत्री मानसी नाईकने आपल्या खास शैलीत नऊवारी परिधान फोटोशूट केले आहे. तिचा हा सोज्वळ लूक पाहते चाहत्यांनी तिच्या पोस्टला भरभरून लाइक दिले आहे.
मानसीचे हे मनमोहक फोटोज पाहताना अनेक चाहते शायर आणि कवी देखील बनले आहे. आपल्या विविध प्रेम कविता त्यांनी कमेंट सेक्शनमध्ये टाकल्या आहेत.
या फोटोजमध्ये मानसी नाईकचा एक ऐतिहासिक लूक पाहायला मिळत आहे जिथे ती तुळशी वृंदावनाच्या बाजूला बसली आहे. यावेळी तिच्या हातात ओवाळणीचे ताट देखील पाहायला मिळत आहे.
हे सुंदर फोटोज शेअर करताना मानसी कॅप्शनमध्ये लिहिते की चांगल्या गोष्टी त्यांना मिळतात, जे वाट पाहतात. अधिक चांगल्या गोष्टी त्यांना मिळतात, जे प्रयत्न करतात. पण सर्वोत्तम गोष्टी त्यांनाच मिळतात, जे आपल्या प्रयत्नांवर अतूट विश्वास ठेवतात. आयुष्य अवघड आहे पण, अशक्य नक्कीच नाही.
मानसी नाईक ही एक चांगली अभिनेत्री असण्यासोबतच, एक उत्तम नृत्यकलाकार देखील आहे. तिने नेहमीच आपल्या नृत्याने प्रेक्षकांना भुरळ पाडली आहे.