लग्न सराईच्या दिवसांना सुरुवात झाली आहे. लग्नाच्या दोन ते तीन महिने आधीपासून सगळ्या गोष्टींची खरेदी केली जाते. लग्नाच्या आधल्या दिवशी हळदीला खूप जास्त धमाल मस्ती केली जाते. भारतीय विवाह सोहळ्यातील प्रत्येक विधीला विशेष महत्व आहे. हळदी समारंभात प्रामुख्याने पिवळ्या रंगाची साडी किंवा ड्रेस घातला जातो. हळदीचा लुक आणखीनच उठावदार आणि स्टायलिश दिसण्यासाठी ओरिजनल फुलांचे दागिने घातले जाते. दागिन्यांसोबतच फुलांचा वापर करून बनवलेला दुप्पटासुद्धा खूप ट्रेडींगला आहे. चला तर पाहुयात हळदी सोहळ्यातील स्टायलिश दुप्पटा डिझाईन. (फोटो सौजन्य – pinterest)
हळदीच्या साडीवरील लुक मनमोहक करण्यासाठी परिधान करा मोगऱ्याच्या फुलांचा दुप्पटा

साध्या पिवळ्या लेहंग्याला, अनारकलीला किंवा अगदी प्लेन कुर्तीला स्टायलिश लुक देण्यासाठी फुलांच्या दुप्पटयाची निवड करू शकता. या पद्धतीने डिझाईन केलेला दुप्पटा पिवळ्या रंगाच्या साडी किंवा लेहेंग्यावर तुम्ही घालू शकता.

काहींना अतिशय साधी पण आकर्षक वाटणारे फुलांचे दुप्पटे हवे असतात. त्यामुळे साडीच्या पदराला या पद्धतीने दुप्पटा स्टायलिश करू शकता. दुप्पटा बनवण्यासाठी कायमच मोगऱ्याच्या किंवा गुलाबाच्या फुलांचा वापर केला जातो.

हळदी सोहळ्यात इतरांपेक्षा वेगळा आणि युनिक लुक हवा असल्यास या पद्धतीने फुलांचा दुप्पटा बनवून घ्या. बाजारात कस्टमाईज दुप्पटा उपलब्ध आहेत.

खऱ्याखुऱ्या फुलांपासून आणि कळ्यांपासून बनवलेले फुलांचे दुपट्टे वधूच्या सौंदर्यात भर घालतात. फुलांचा वापर करून बनवलेले सुंदर दुप्पटे सध्या ट्रेडींगला आहेत.

हळदीच्या दिवशी नवी नवरी हिरव्या रंगाची साडी नेसते. हिरव्या रंगाच्या साडीवर पांढऱ्या फुलांचे दुप्पते अतिशय उठावदार दिसतात. पांढऱ्या फुलांच्या दुप्पटयाला गुलाबाच्या फुलांची काठ लावू शकता.






