(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
या वर्षात अनेक कलाकारांच्या लग्नाच्या बातम्या समोर येत आहेत. गेल्या काही दिवसांत मराठी मनोरंजन विश्वातील कलाकारांनी आपल्या जोडीदारांबरोबर लग्नगाठ बांधली आहे. नुकताच अभिनेता सिद्धार्थ खिरीड लग्नबंधनात अडकला आहे. अशातच अजून एक अभिनता बोहल्यावर चढला आहे.
स्टार प्रवाहवरील लक्ष्मीच्या पाऊलांनी या प्रसिद्ध मालिकेतून घराघरात पोहोचलेला सोहम म्हणजेच अभिनेता ऋत्विक तळवलकर नुकताच लग्नबंधनात अडकला आहे. सध्या त्याच्या शाही विवाह सोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ऋत्विक सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असतो. त्याने लग्नाचे खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. काही दिवसांपासून तो प्री – वेडिंगचे फोटो शेअर करत होता. त्यानंतर त्याने बॅचलर पार्टीचे देखील फोटो आपल्या चाहत्यांसाठी शेअर केले होते. अशातच त्याने त्याच्या गर्लफ्रेंडसह लग्नगाठ बांधली आहे.
लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेतून घराघरात पोहोचलेल्या ऋत्विकने मालिका संपताच अभिनेत्याचे त्याच्या आयुष्यातील नव्या इनिंगला सुरूवात केली आहे. अलिकडेच ४ वर्षांच्या रिलेशनशिपनंतर ऋत्विक तळवळकरने त्याचं नातं जगजाहीर केले होते. त्याने जुलै महिन्यात त्याच्या गर्लफ्रेंड अनुष्का चंदकला प्रपोज करत सोशल मीडियावर खास क्षण शेअर केले. त्यानंतर आता मोठ्या थाटामाटात त्याचा लग्नसोहळा पार पडला आहे. या दोघांच्या साखरपुड्याचे फोटो सर्वत्र बरेच व्हायरल झाले होते. यानंतर ही जोडी लग्न केव्हा करणार याच्या चर्चा रंगल्या होत्या. अखेर आता त्यांच्या लग्नाचे फोटो समोर आले आहेत.
‘…कोणाच्या बापाचा नाही,’ कैसे हराया म्हणणाऱ्या AIMIMच्या नगरसेविकेच्या वक्तव्यावर सयाजी शिंदे यांची रोखठोक प्रतिक्रिया
ऋत्विकची पत्नी म्हणजे अनुष्का एक उत्तम क्लासिकल डान्सर आहे. सोशल मीडियावर तिचे अनेक डान्स व्हिडिओ शेअर केलेले आहेत. ऋत्विक आणि अनुष्काच्या लग्नाचे फोटो पाहून मराठी कलाकरांनी आणि चाहत्यांनी त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला असून त्यांच्या पोस्टवर कमेंट्सचा पाऊस पाडला आहे.






