नॅन्सी त्यागीने कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये तिच्या दुसऱ्या लुकसाठी मोत्यांनी जडवलेला मिनी ड्रेस परिधान करून फॅशनप्रेमींच्या मनात पुन्हा एकदा स्थान निर्माण केले आहे. पहिल्या दिवशी चमकल्या नंतर नॅन्सीने दुसऱ्या दिवशी देखील आपले स्थान मिळवले आहे. तिचा ड्रेस आणि सुंदर लुक पाहून चाहते चकीत झाले आहेत. जे मोठं मोठे कलाकार करू शकले नाहीत ते नॅन्सीने करून दाखवले आहे, याचसाठी देशाला तिचा आभिमान वाटत आहे. या ड्रेसमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. तिचे फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
कान्समध्ये दुसऱ्या दिवशीही नॅन्सीचीच हवा; रेड कार्पेटवर दाखवल्या सोनेरी अदा, पाहा PHOTOS
२०२४ मध्ये कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये नॅन्सी त्यागीने सुंदर ड्रेसमध्ये बार्बीसारखी दिसून सर्वांनाच आश्चर्यचकित केले होते. २८ व्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्येही तिच्या लुकने पुन्हा एकदा सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
नॅन्सीचा पहिला लुक आपण सर्वानीच बघितला आहे, ज्यामध्ये ती एका भव्य निळ्या ड्रेसमध्ये आणि काही अनोख्या ॲक्सेसरीजमध्ये दिसली होती. जो ड्रेस संपूर्ण गुलाबाच्या फुलांनी भरलेला होता.
तसेच आता नॅन्सीने दुसऱ्या लुकसाठी, मिनी-ड्रेसची निवड केली होती. जो तिच्यावर खूप सुंदर दिसत आहे. हा ड्रेस सोनेरी मोत्यांनी सजवलेला आहे. तसेच त्याला सिल्क ब्राउन रंगाचे जॅकेट जोडलेले आहे.
या ड्रेसवर जोडलेला सिल्क ओव्हरकोट तिच्या या सुंदर मिनी-ड्रेसची शोभा वाढवत होता. तर ओव्हरकोट खांद्याच्या बाजूने फुगलेला होता. तसेच नॅन्सीने मोती-एम्बेडेड हँडबॅग घेतली होती, जी या ड्रेसवर अतिशय आकर्षित दिसत होती.
नॅन्सीने मिनी ड्रेससोबत केसांची बांधलेला हेअरस्टाइल निवडली. तिच्या चेहऱ्याला ही हेअरस्टाइल अगदी परिपूर्ण दिसत होती. तसेच तिने गळ्यात कोणताही नेकलेस न घालता कानामध्ये मोठे गोल्डन रंगाचे इअरिंग परिधान केल्या होत्या.
तिचा मेकअप देखील आनंदी मोहक वाटत होता, ज्यामध्ये जाड भुवया, लिप-ग्लॉस आणि भरपूर हायलाइटरसह मेकअपचा समावेश होता. नॅन्सी या दुसऱ्या लुकने देखील चाहत्यांना घायाळ केले आहे आणि त्याने लक्ष पुन्हा एकदा स्वतःकडे वेधून घेतले आहे.