काहींना थोडसं काम केल्यानंतर किंवा बाहेरून जाऊन आल्यानंतर सतत थकवा जाणवतो. थकवा जाणवू लागल्यानंतर कोणतेही काम करण्याची इच्छा होत नाही. शरीराची शक्ती कमी झाल्यानंतर आरोग्यसुद्धा बिघडण्याची शक्यता असते. त्यामुळे योग्य तो आहार घेऊन आरोग्याची व्यवस्थित काळजी घ्यावी. शरीरातील कमी झालेला स्टॅमिना नैसर्गिकरित्या वाढवण्यासाठी आहारात पौष्टिक पदार्थांच्या समावेश करावा.आज आम्ही तुम्हाला शरीरातील स्टॅमिना वाढवण्यासाठी कोणत्या पदार्थांचे सेवन करावे, याबद्दल सांगणार आहोत.(फोटो सौजन्य-istock)
नैसर्गिकरित्या स्टॅमिना वाढवण्यासाठी 'या' पदार्थांचे करा सेवन
लोहयुक्त बीटरूटचे सेवन केल्यामुळे शरीरातील रक्त प्रवास सुरळीत राहण्यास मदत होते. त्यामुळे रोजच्या आहारात बीटरूट खाल्ल्याने ऊर्जा आणि स्टॅमिना दोन्ही वाढेल.
केळ्यांमध्ये भरपूर प्रमाणात जीवनसत्त्वे, फायबर आणि पोटॅशियम आढळून येते, ज्यामुळे शरीराची ऊर्जा वाढण्यास मदत होते.
चिया सीड्सचे सेवन केल्याने अँटी-ऑक्सिडंट्स, प्रथिने, फायबर, कॅल्शियम वाढते. सकाळी उठल्यानंतर एक ग्लास पाण्यात एक चमचा चिया सीड्स मिक्स करून पाणी प्यावे.
लापशीमध्ये अनेक पोषक घटक आढळून येतात, जे आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. आठवड्यतून एकदा किंवा दोनदा लापशीचे सेवन केल्यास शरीरातील फायबर वाढून शरीराला ऊर्जा मिळेल.
सकाळी उठल्यानंतर ५ ते ६ भिजवलेले बदाम खावेत. बदाम खाल्ल्याने शरीराची क्षमता वाढण्यास मदत होईल.बदाम खाल्ल्याने शरीराला ऊर्जा मिळेल.