पंधरवाडा संपल्यानंतर लगेच नवरात्री उत्सवाला सुरुवात होते. यंदाच्या वर्षी २२ सप्टेंबरपासून नवरात्री उत्सवाला सुरुवात होते. लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांना नवरात्री उत्सव खूप जास्त आवडतो. या उत्सवात देवीची आराधना, गरबा, दांडिया खेळल्या जातात. सगळीकडे गरबा आणि दांडियांचे आयोजन केले जाते. नवरात्रीमध्ये महिलांचा उत्साह वाढवणारी गोष्ट म्हणजे नवरात्रींचे नऊ रंग. आज आम्ही तुम्हाला यंदाच्या वर्षी नवरात्रीचे रंग कोणते आहेत? या रंगाचा नेमका अर्थ काय? याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. नवरात्रीमध्ये महिला वेगवेगळ्या रंगाच्या साड्या नेसतात. (फोटो सौजन्य: Pinterest)
नवरात्रींचे नवरंग 2025 मध्ये कसे असणार, आताच निवडा 'या' रंगाच्या साड्या
नवरात्रीचा पहिला रंग पांढरा. सर्वच महिलांकडे पांढऱ्या रंगाच्या साड्या असतात. त्यामुळे पांढऱ्या साडीवर तुम्ही कॉन्ट्रास्ट ब्लाऊज परिधान करू शकता.
नवरात्रीचा दुसरा रंग लाल. लाल रंगाची बनारसी किंवा पैठणी साडी अतिशय रॉयल लुक देते. वेगवेगळ्या शेड्स असलेली लाल रंगाची साडी सगळ्यांवर अतिशय सुंदर दिसते.
नवरात्रीचा तिसरा रंग निळा. निळा रंग शांतता, अथांगता याचे प्रतीक मानला जातो. प्रत्येक महिलेच्या कपाटात एकतरी निळ्या रंगाची साडी असतेच.
चौथ्या माळेचा रंग पिवळा. पिवळा गुलाबी, पिवळा लाल किंवा पूर्णपणे पिवळ्या रंगाची साडी अतिशय सुंदर दिसते. पिवळ्या रंगाच्या साडीवर मोत्याचे दागिने अतिशय सुंदर दिसतात.
समृद्धी, संपन्नतेचे प्रतीक म्हणजे हिरवा रंग. हिरव्या रंगाच्या भरपूर साड्या सर्वच महिलांकडे असतात.हिरव्या रंगाची पैठणी साडी सणावाराच्या दिवसांमध्ये अतिशय सुंदर दिसते.
नवरात्रीच्या सहाव्या माळेला करडा रंग आहे. आपल्यातील अनेकांना करडा रंग आवडत नाही. पण नवरात्रीमध्ये अनेक महिला उत्साहाने करड्या रंगाची साडी नेसतात.
नवरात्रीच्या सातव्या माळेचा रंग नारंगी. केशरी रंगाची सिल्क साडी तुम्ही नवरात्री उत्सवामध्ये नेसू शकता.
सर्वच महिलांचा आवडता रंग म्हणजे मोरपंखी. प्रत्येक महिलेच्या कपाटात एकतरी मोरपंखी रंगाची साडी असतेच. हा रंग सगळ्यांवर अतिशय खुलून दिसतो.
नवरात्रीचा शेवटचा रंग गुलाबी. सगळ्यांकडे गुलाबी रंगाच्या खूप साड्या असतात. ऑफिसमध्ये साडी नेसून जायची असेल तर तुम्ही कॉटनची गुलाबी साडी नेसू शकता.