वाढलेले वजन आणि लठ्ठपणा कमी करण्यासाठी अनेक लोक महागडे डाएट, सप्लिमेंट्स तर काहीवेळा तासनतास जिममध्ये जाऊन व्यायाम करतात. शरीरावर वाढलेला अनावश्यक चरबीचा थर काहीवेळा महिलांचा आत्मविश्वास कमी करून टाकतो. वजन वाढल्यानंतर सकाळचा नाश्ता आणि संध्याकाळचे जेवण स्किप केले जाते. पण असे केल्यामुळे शरीरात खूप जास्त थकवा वाढून आजारपण येते. त्यामुळे सकाळच्या नाश्त्यात कमी कॅलरीज असलेल्या पदार्थांचे सेवन करावे. हे पदार्थ खाल्ल्यानंतर पोट दीर्घकाळ भरलेले राहते आणि लवकर भूक लागत नाही. (फोटो सौजन्य – istock)
दिवसभर लागण नाही अजिबात भूक! वाढलेले वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी 'या' पदार्थांचे करा सेवन

सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट तयार होणारा पदार्थ म्हणजे कांदापोहे. कांदापोहे खाल्ल्यानंतर पोट सुद्धा भरलेले राहते आणि लवकर काही खाण्याची इच्छा होत नाही. यातील कॅलरीज कमी करण्यासाठी त्यात वेगवेगळ्या भाज्या टाकाव्यात.

मूग डाळ चिल्लामध्ये कॅलरीज कमी असतात. त्यामुळे आठवड्यातून दोनदा किंवा तीनदा वेगवेगळ्या पद्धतीने बनवलेला मुगडाळ चिल्ला तुम्ही खाऊ शकता.

सकाळच्या नाश्त्यात चहा किंवा बिस्कीट खाण्याऐवजी मोड आलेल्या कढधान्यांपासून बनवलेले सॅलड खावे. यामुळे शरीराला फायदे होण्यासोबतच पोट दीर्घकाळ भरलेले राहते.

वेगवेगळ्या भाज्या, अतिशय कमी मसाले आणि ओट्सचा वापर करून बनवलेले मसालादेर ओट्स चवीला अतिशय सुंदर लागतात. त्यामुळे हा पदार्थ तुम्हीव दुपारच्या जेवणासाठी सुद्धा खाऊ शकता.

कमी कॅलरीज आणि कमी गोड असलेल्या फळे, भाज्यांपासून बनवलेली स्मूदी चवीला अतिशय सुंदर लागते. स्मूदी हा पदार्थ तुम्ही कोणत्याही वेळी खाऊ शकता.






