आजकालच्या जगामध्ये शिक्षण खूप महत्वाचे झाले आहे. शिक्षणा व्यतिरिक्त माणसाला पर्याय नाही, असे अनेकदा म्हंटले जाते. एकंदरीत, शिक्षण व्यक्तीची मूलभूत गरज बनली आहे. आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी पालक पैसे अगदी पाण्यासारखा ओतत आहेत. कॉलेजमध्ये एखाद्या विषयात डिग्री घेणेही फार महाग झाले आहे. परंतु, जगात असे अनेक नोकऱ्या आहेत ज्याच्यासाठी कॉलेजची डिग्री असणे फार काही गरजेचे नाही.
काही जॉब्स असे आहेत, ज्यासाठी मोठ्या डिग्रीची गरज भासत नाही, जाणून घ्या. फोटो सौजन्य - Social Media
आजच्या काळात डिजिटल मार्केटरला खूप मागणी आहे. डिजिटल मार्केटिंगमध्ये एखादा सोशल मीडिया हॅन्डल सांभाळणे, कॉन्टेन्ट तयार करण्यासारखे कामे मिळू शकतात. अनेक कंपनी अशा लोकांचा शोधत असतात ज्यांना वरील गोष्टी येतात.
सध्याच्या काळात लहान व्यवसायापासून ते मोठमोठ्या कंपन्याना जाहिरातीसाठी ग्राफिक डिझायनर लागतो. आपल्या कलेपासून जाहिराती तयार करणे, लोगो तसेच वेबसाईट तयार करण्याचे काम ग्राफिक डिझाइनर करतो.
डॉक्टरच्या दवाखान्यात किंवा मोठमोठ्या रुगालयात मेडिकल असिस्टंटची गरज भासते. या कामासाठी कोणत्या डिग्रीची गरज मुळीच नसते.
स्वयंपाक करणे आवड असेल आणि त्यात किताब मिळवला असेल तर हे काम तुमच्यासाठीच आहे. यासाठी कोणताही महाविद्यालयीन कोर्स करण्याची गरज नाही.
स्वतःचा व्यवसाय सुरु करण्यासाठी आयडियांची गरज असते. अनेक अशिक्षित लोकांनीदेखील या क्षेत्रात मोठे नाव कमवले आहे. व्यवसाय जिद्द्दीने आणि हुशारीने केले जाते त्यासाठी कॉलेजचे प्रमाणपत्र गरजेचे नसते.