पॅरिस पॅरालिम्पिक २०२४ मध्ये भारताच्या पॅरा खेळाडूंनी पहिल्या दिवसांपासून दमदार कामगिरी करत इतिहास घडवला. भारताने पॅरिस पॅरालिम्पिक २०२४ मध्ये २९ पदकांची कमाई केली आहे. यामध्ये ७ सुवर्ण पदक, ९ रौम्य पदक आणि १३ कास्यपदकांचा समावेश आहे. भारत मेडलटॅलीमध्ये १८ व्या क्रमांकावर राहिला. भारताच्या हाती पॅरिस ऑलिम्पिकमध्ये प्रेक्षकांची निराशा झाली होती परंतु भारताच्या पॅरा खेळाडूंनी पॅरालिम्पिकमध्ये सर्व कसर पूर्ण केली. काल म्हणजेच ८ सप्टेंबर रोजी पॅरिस पॅरालिम्पिक २०२४ समारोप समारंभ पार पडला. यामधील काही खास फोटोंवर नजर टाका.
भारताचे पॅरिस पॅरालिम्पिक २०२४ मध्ये समारोप समारंभासाठी ध्वजवाहक हरविंदर सिंह-प्रीति पाल. फोटो सौजन्य - सोशल मीडिया
संगीतकार सांता हिने पॅरिस पॅरालिम्पिक २०२४ समारोप समारंभ कार्यक्रमाला तिच्या गायनाने चाहत्यांना वेड लावलं. फोटो सौजन्य - ऑलिम्पिक खेळ सोशल मीडिया
पॅरिस पॅरालिम्पिक २०२४ समारोप समारंभामध्ये भारताचे ध्वजवाहक भारताचा सुवर्ण पदक विजेता तिरंदाज हरविंदर सिंह आणि धावपटू दोन कांस्यपदक नावावर करणारी प्रीति पाल हे होते. फोटो सौजन्य - Boria Majumdar सोशल मीडिया
पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये जल्लोषात समारोप समारंभ पार पडला. यामध्ये सर्व सहभागी झालेले देशांनी त्यांचा झेंडा फडकवला. फोटो सौजन्य - Boria Majumdar सोशल मीडिया
पॅरिस पॅरालिम्पिक २०२४ च्या समारोप समारंभाच्या दिनी भारताचे अनेक खेळाडू हे उपस्थिती होते त्यांच्यासोबत सपोर्ट स्टाफदेखील सामील झाला होता. फोटो सौजन्य - Boria Majumdar सोशल मीडिया
thane (86)