प्रयागराज : उत्तर प्रदेशमधील प्रयागराजमध्ये महाकुंभमेळा सुरु आहे. 144 वर्षांनी येणाऱ्या या महाकुंभमेळ्याने जगाचे लक्ष वेधले आहे. करोडो नागा साधू आणि भाविकांनी गंगामध्ये अमृतस्नान केले आहे. याचबरोबर आता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील महाकुंभमेळ्यामध्ये अमृत स्नान केले आहे.
pm Narendra Modi Ganges sanan participating in the Mahakumbh Mela prayagraj 2025
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संगमात स्नान केले आणि गंगेची पूजा केली आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ पंतप्रधानांना नावेतून त्रिवेणी संगमाला घेऊन गेले.
पंतप्रधान मोदी यांनी गंगा आरती देखील केली. त्याचबरोबर गंगा मातेला साडी देखील वाहिली आहे. किनाऱ्यावर उपस्थित असलेले लोक पंतप्रधान मोदींना पाहण्यासाठी जमले होते. यावेळी मोदी-मोदीच्या घोषणाही ऐकू आल्या आहेत.
गंगा पूजा करताना पंतप्रधान मोदी यांनी खास पेहराव केला होता. यावेळी त्यांनी नेव्ही ब्लू कुर्ता, काळा जॅकेट आणि हिमाचली लोकरीची टोपी घालून आरती केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गंगेमध्ये जाऊन स्नान देखील केले. यावेळी त्यांनी गंगेमध्ये डुबकी मारली. तसेच माळा देखील जपली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नदीत गुडघ्यापर्यंत उभे राहून प्रार्थना करताना त्यांनी ‘रुद्राक्षांच्या माळा धरून मंत्रांचा जप केला. त्यानंतर त्यांनी त्रिवेणी संगमात पवित्र अमृतस्नान केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घातलेल्या माळेची देखील सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. पंतप्रधान मोदी यांनी गंगास्नानवेळी रुद्राक्षाची माळ गळ्यामध्ये घातली होती.