साडी हा पारंपरिक पोशाख सर्वच महिलांना खूप जास्त आवडतो. घरातील कोणताही कार्यक्रम, लग्न किंवा इतर सर्वच सोहळ्यांसाठी महिला आवर्जून साडी नेसतात. कांजीवरम सिल्क, पैठणी, डिझाइनर, माहेश्वरी इत्यादी विविध राज्यातील फेमस साड्यांची खरेदी कायमच केली जाते. साडी खरेदी केल्यानंतर त्यावर नेमका कशा डिझाईनचा ब्लाऊज शिवून घ्यावा, याचा खूप जास्त विचार करावा लागतो. त्यातील अतिशय फेमस ब्लाऊज डिझाईन म्हणजे फुग्यांच्या बाह्यांची फॅशन. ही फॅशन १९७० ते ८० च्या दशकात लोकप्रिय होती.जिला स्टायलिश आणि मॉर्डन टच देऊन वेगवेगळ्या डिझाईनचे ब्लाऊज शिवून घेतले जातात. (फोटो सौजन्य – pinterest)
फुग्यांच्या ब्लाऊजची मोठी क्रेझ! नवीन साडीवर शिवून घ्या स्टायलिश डिझाईनचे पफ स्लिव्ह्ज ब्लाऊज

कॉटन किंवा माहेश्वरी साडीवर शॉर्ट लेन्थ फुग्यांचा ब्लाऊज शोभून दिसेल. ब्लाऊजच्या हातांना साडीच्या काठाचा लेस संपूर्ण ब्लाऊजचा लुक मॉर्डन बनवते.

कांजीवरम सिल्क किंवा सिल्कच्या कोणत्याही पैठणी साडीवर लांब हातांचे पफ स्लिव्ह्ज असलेले ब्लाऊज तुम्ही शिवून घेऊ शकता. यावर आरी वर्क किंवा स्टोन वर्क केल्यास ब्लाऊजचा लुक पूर्णपणे बदलून जाईल.

ऑर्गेंझा, नेट, सिल्क किंवा ब्रॉकेट कोणत्याही कडक फॅब्रिक असलेल्या साड्यांच्या ब्लाऊजवर या डिझाईनचे फुग्यांच्या हाताचे ब्लाऊज अतिशय सुंदर दिसेल.

कॉटनच्या साडीवर तुम्ही या पॅर्टनचे पफ स्लीव्हज ब्लाऊज शिवून घेऊ शकता. सध्या पफ स्लीव्हज ब्लाऊजची मोठी क्रेझ वाढली आहे.

एल्बो लेंथ शॉर्ट पफ आणि बलून स्लिव्हज असे अनेक वेगवेगळे डिझाईन सोशल मीडियासह इतर अनेक ठिकणी पाहायला मिळतात. साडीवरील लुक स्टायलिश करण्यासाठी या पॅर्टनचे ब्लाऊज तुम्ही शिवून घेऊ शकता.






