काय घडलं नेमकं?
मृत महिलेला तिच्या सासरच्या लोकांसोबत गावी राहायचं नव्हतं आणी त्यामुळे ती पतीकडे भोपाळमध्येच कायमचं राहण्याचा हट्ट करत होती. याच कारणामुळे पीडित पत्नी आणि तिच्या पतीमध्ये सतत वाद होत होते. याच कारणावरून घटनेच्या दिवशी देखील दोघांमध्ये वाद झाला आणि या वादाचं रूपांतर मारहाणीत झालं. रागाच्या भरात आरोपी पती हेमराजने आपल्या पत्नीचा गळा दाबला. त्यानंतर यामध्ये तिचा जागीच मृत्यू झाला. एवढेच नाही तर हत्येनंतर आरोपीने स्वतः पीडितेच्या नातेवाईकांना फोन करून हत्येची माहिती दिली.
त्यांनी पोलिसांना या घटनेची माहिती दिली. पोलीस तातडीने घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर, महिलेचा मृतदेह ताब्यात घेऊन तो पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपी हेमराजला अटक केली आहे.
१४ महिन्यांपूर्वीच झालं होत लग्न
१४ महिन्यांपूर्वीच दोघांचं लग्न झालं होत. या दोघांचं हे दुसरं लग्न होत. आरोपी हा भाजीविक्रेता म्हणून काम करत होता. दोघांमध्ये सतत वाद होत होते. याच वादातून हत्या करण्यात आल्याचे समोर आले आहे. पोलीस आता या प्रकरणाचा तपास करत आहे.
Madhyapradesh: एमपीत धक्कादायक घटना! वसतिगृहातील नववीच्या विद्यार्थिनीने उचलला टोकाचा पाऊल; कारण काय?
मध्यप्रदेश: मध्यप्रदेश येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका नववीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. ही घटना बडवाणी जिल्ह्यातील निवाली एकलव्य आदर्श शासकीय निवासी वसतिगृहात मंगळवारी घडली. विद्यार्थिनीने स्टोअर रूममध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेने मृत विद्यार्थिनीच्या कुटुंबीयांनी वसतिगृह प्रशासनावर गंभीर दुर्लक्ष आणि मानसिक दबाव टाकल्याचे आरोप करत कडक कारवाईची मागणी केली आहे.
Ans: मध्य प्रदेशातील भोपाल शहरात.
Ans: पत्नीचा भोपालमध्येच कायम राहण्याचा हट्ट आणि कौटुंबिक वाद.
Ans: आरोपी पतीला अटक करून प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.






