टीव्ही सिरिअल्स पाहणे अनेकांना आवडते. पूर्वीपासून हे लोकांच्या मनोरंजनाचे काम करते आणि अजूनही तितक्यात जोमात सुरु आहे. वेब सिरीज, शॉर्ट फिल्म्स अशा अनेक नवनवीन गोष्टी टेलिव्हिजनशी जोडल्या जाऊ लागल्या मात्र सिरीयलचे क्रेझ काही संपले नाही. आजही लोक फार आवडीने आपल्या टीव्ही समोर बसू या सिरिअल्स पाहू लागतात. देशात अनेक लोकप्रिय सिरिअल्स आहेत ज्यांनी लोकांच्या मनात आपले एक वेगळे स्थान निर्माण केले मात्र आज आम्ही तुम्हाला देशातील अशा एका सिरिअलविषयी माहिती सांगत आहोत जिला अजूनही लोक आवडीने पाहतात आणि सर्वाधिक पहिल्या जाणाऱ्या सिरिअल्समध्ये याने प्रथमस्थान पटकावले. याचा विक्रम आजपर्यंत कोणीही मोडू शकला नाही.
नागीण, बिग बॉस नाही तर 'ही' आहे देशातील सर्वाधिक पाहिलेली TV Serial; 37 वर्षांत कुणीही मोडू शकला नाही याचा विक्रम
आम्ही ज्या सिरिअलविषयी बोलत आहोत ती सिरिअल म्हणजे रामानंद सागर यांची 'रामायण'! ही मालिका तब्बल ३७ वर्षांपूर्वी आली होती आणि विशेष म्हणजे लोक आजही त्याच उत्साहाने या मालिकेला पाहतात. या मालिकेला आतापर्यंत ७.७ कोटी लोकांनी पाहिले आहे. त्याकाळीही टीआरपीच्या यादीत ही मालिका पहिल्या क्रमांकावर होती
रामानंद सागर यांची रामायण मालिका संपल्यानंतर तीन दशकांनंतरही सर्वाधिक पाहिली जाणारी भारतीय टीव्ही मालिका आहे. जानेवारी १९८७ ते जुलै १९८८ या काळात ही मालिका दूरदर्शनवर प्रसारित प्रसारित झाली
ऐतिहासिक माहितीनुसार, मालिकेतील मेघनाद आणि लक्ष्मण यांच्यातील लढाई प्रेक्षकांना खूप आवडली. या भागाला सुमारे ७७ दशलक्ष म्हणजेच ७.७ व्ह्यूज मिळाले. हा भारतीय टेलिव्हिजनसाठी एक विक्रम आहे, जो आजपर्यंत कोणी मोडू शकला नाही
यानंतरही रामायणावर अनेक मालिका बनवल्या गेल्या मात्र रामानंद सागर यांच्या रामायण मालिकेला आजही भरभरून प्रेम दिले जाते
आजवर रामायण मालिकेएवढी टीआरपी कोणीही मिळवू शकलं नाही. आजवर कुणीही अशी मालिका बनवू शकलं नाझी जे या मालीकेचा विक्रम मोडू शकेल