सकाळी उठल्यानंतर अनेकांना उपाशी पोटी कोमट पाणी पिण्याची सवय असते. पण नुसतेच कोमट पाणी न पिता पाण्यासोबत मोरिंगाच्या पानांचे सेवन केल्यास शरीरात साचून राहिलेले विषारी घटक बाहेर पडून जाण्यास मदत होईल आणि शरीराला इतरही अनेक फायदे होतील. मोरिंगाच्या पानांमध्ये व्हिटॅमिन-ए, सी, कॅल्शियम, पोटॅशियम आणि लोह इत्यादी आवश्यक खनिजे आणि जीवनसत्वे मोठ्या प्रमाणावर आढळून येतात. आज आम्ही तुम्हाला नियमित मोरिंगाच्या पानांचे सेवन केल्यामुळे आरोग्याला नेमके काय फायदे होतात, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. या पानांमध्ये असलेले घटक शरीरासाठी अतिशय गुणकारी आहेत. (फोटो सौजन्य – istock)
सकाळी उठल्यानंतर नियमित करा मोरिंगाच्या पानांचे सेवन
शरीरात निर्माण झालेली रक्ताची कमतरता भरून काढण्यासाठी मोरिंगाच्या पानांचे सेवन करावे. या पानांच्या सेवनामुळे शरीराला ऊर्जा मिळते आणि आरोग्य सुधारण्यास मदत होते.
गॅस, अपचन किंवा पचनाच्या इतर समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी मोरिंगाच्या पानांचे सेवन करावे. यामुळे शरीरात साचून राहिलेले विषारी घटक बाहेर पडून जातात.
वाढलेले वजन कमी करण्यासाठी अनेक वेगवेगळ्या पेयांचे सेवन केले जाते. पण हे सर्व करण्यापेक्षा सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी मोरिंगाच्या पानांचे किंवा पावडरचे कोमट पाण्यासोबत सेवन करावे.
शरीराची कमी झालेली रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यासाठी मोरिंगाच्या पानांचे सेवन करावे. या पानांच्या सेवनामुळे शरीर स्वच्छ होईल आणि शरीराची ऊर्जा वाढेल.
रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी मोरिंगाच्या पानांच्या सेवन करावे. याशिवाय शरीरात वाढलेले खराब कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी मोरिंगाच्या पावडरचे सेवन करू शकता.