लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं पपई खायला खूप जास्त आवडतो. पपईमध्ये असलेले गुणकारी घटक शरीर कायमच निरोगी राहतात. यामध्ये भरपूर फायबर, विटामिन सी, जीवनसत्वे आणि खनिजे आढळून येतात. बऱ्याचदा तिखट आणि तेलकट पदार्थांचे सेवन केल्यामुळे शरीराची पचनक्रिया काहीशी बिघडून जाते. बिघडलेली पचनक्रिया सुधारण्यासाठी नियमित उपाशी पोटी पपई खावी. यामुळे शरीरात साचून राहिलेले विषारी घटक बाहेर पडून जातील आणि आरोग्य सुधारेल. आज आम्ही तुम्हाला रिकाम्या पोटी पपईचे सेवन केल्यास शरीराला नेमके काय फायदे होतात, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. (फोटो सौजन्य – istock)
रिकाम्या पोटी नियमित पपई खाल्ल्यास शरीराला होतील भरमसाट फायदे! कर्करोगाचा धोका होईल कायमचा कमी

सकाळच्या नाश्त्याआधी पपईचे सेवन करावे. पपई खाल्यामुळे साथीच्या आजारांमुळे शरीराची कमकुवत झालेली रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यास मदत होईल. यामध्ये असलेले विटामिन सो शरीराची सर्दी आणि संसर्गाशी लढण्यास मदत करते.

बिघडलेली पचनक्रिया सुधरण्यासाठी पपई वरदान ठरेल. गॅस, बद्धकोष्ठता, अपचन, ऍसिडिटी इत्यादी सर्वच समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी पपई खाण्याचा सल्ला दिला जातो.

पपईमध्ये विटामिन ए आणि बीटा-कॅरोटीन इत्यादी अनेक घटक आढळून येतात, ज्यामुळे डोळ्यांची दृष्टी सुधारते. वय वाढल्यानंतर मोतीबिंदू किंवा काच बिंदू होण्याची जास्त शक्यता असते. या सर्वच समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी पपई खावी.

त्वचेवर वाढलेले टॅनिंग, डेड स्किन कमी करण्यासाठी पपई फेसपॅक लावला जातो. हे उपाय करण्यासोबतच सकाळच्या नाश्त्यात नियमित पपई खावी. यामध्ये असलेल्या अँटीऑक्सिडंट्स आणि विटामिन सी मुळे त्वचेचा रंग उजळदार होतो.

वाढलेले वजन कमी करताना आहारात वेगवेगळ्या पदार्थांचे सेवन केले जाते. या पदार्थांसोबतच पपईचे सुद्धा सेवन करावे. पपईमध्ये खूप कमी कॅलरीज असतात आणि शरीरातील विषारी घटक बाहेर काढून टाकण्यासाठी पपई गुणकारी ठरते.






