धावपळीच्या जीवनशैलीमुळे शरीराकडे वेळ देण्यासाठी जास्त वेळ मिळत नाही. तासनतास एका जागेवर बसून राहिल्यामुळे शरीरावर जास्तीचा तणाव निर्माण होतो. ज्यामुळे पाठ दुखणे, कंबर दुखणे, हाडांमध्ये वेदना इत्यादी अनेक गंभीर समस्या उद्भवण्याची शक्यता असते. या सर्वच समस्यांकडे कायमच दुर्लक्ष केले जाते. मात्र कालांतराने पाठीच्या वेदना वाढतात आणि शरीराला हानी पोहचते. त्यामुळे सकाळी उठल्यानंतर नियमित त्रिकोणासन करावे. दिवसभरातील ३० मिनिटं नियमित व्यायाम, प्राणायाम इत्यादी गोष्टींसाठी काढल्यास शरीराला अनेक महत्वपूर्ण फायदे होतील. (फोटो सौजन्य – istock)
पाठदुखी आणि लठ्ठपणापासून सुटका मिळवण्यासाठी नियमित करा त्रिकोणासन

शरीराचे स्नायू कायमच सक्रिय राहण्यासाठी नियमित त्रिकोणासन करावे. पाय, मांड्या, कंबर, हात आणि पाठीतील स्नायू कायमच निरोगी राहतात.

पोटावर वाढलेला चरबीचा घेर कमी करण्यासाठी कायमच योगासने करणे आवश्यक आहे. सकाळी उठल्यानंतर त्रिकोणासन केल्यास महिनाभरात पोट आणि मांड्यावर वाढलेला चरबीचा घेर कमी होईल.

तासनतास एका जागेवर बसून पाठीमध्ये खूप जास्त वेदना होतात.याशिवाय पाठीच्या कण्याला पोक येतो. या सर्व समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी नियमित त्रिकोणासन करावे.

पचनक्रिया सक्रिय करण्यासाठी सकाळी उठल्यानंतर त्रिकोणासन करावे. त्रिकोणासन केल्यामुळे पोट आणि आतड्यांमधील स्नायूंवरील तणाव कमी कमी होतो.

मानसिक तणाव दूर करण्यासाठी सकाळी उठून नियमित योगासने, प्राणायाम इत्यादी गोष्टी केल्यास मानसिक तणावापासून सुटका मिळेल आणि तुम्ही कायमच आनंदी राहाल.






