अभिनेत्री सई कल्याणकरने काही दिवसांअगोदर तिला बाळ झाल्याची गोड बातमी दिली होती. अभिनेत्रीला मुलगी झाली आहे. मुलीचं बारसं झालं आहे. बारशाचे फोटो अभिनेत्रीने तिच्या अधिकृत Instagram Handle वर शेअर केले आहेत. आई-बाबा आणि बाळ, असं सुंदर छोटं कुटुंब यात दिसून येत आहे.
सई कल्याणकरच्या बाळाचं नाव माहितीये का? (फोटो सौजन्य - Social Media)

सई कल्याणकरने @saisudhirkalyankar या सोशल मीडिया हँडलवर फोटो शेअर केले आहेत. नामकरणाचा विधी सोहळा साजरा झाला आहे.

बाळाचं नाव 'नभा' ठेवण्यात आले असून याचा अर्थ आभाळ आहे. कॅप्शनमध्ये अभिनेत्रीने "With Love and Grace, we name our Bundle of Joy...NABHA⛅ (नभा)" असे कॅप्शन दिले आहे.

या सोहळ्यात आई सईने लाल रंगाची साडी नेसली आहे. तसेच नाकामध्ये नाजूक पण बहारदार नथ परिधान केली आहे.

बाळाच्या बाबाने कुर्ता परिधान केला आहे तर इवलुशा नभाने छोटीशी फ्रॉक परिधान केली आहे.

अभिनेत्री सई कल्याणकर 'कमळी' मालिकेत ऋषीची वाहिनीच्या भूमिकेत झळकली होती. त्या भूमिकेतून सई घराघरात पोहचली.






