अभिनेत्री संस्कृती बालगुडे तिच्या अदाकारीने नेहमीच चर्चेत असते. मराठी सिनेसृष्टीतील चाहत्यांची लाडकी म्हणून तिची ओळख बनत चालली आहे. संस्कृती नवनवीन फोटोशूट करत असते. अशात तिने तिचा नवा कोरा फोटोशूट चाहत्यांशी शेअर केला आहे. तिच्या नव्या लुकने नेटकऱ्यांना आकर्षित केले आहे. कमालीची ड्रेसिंग पाहता चाहते आकर्षित झाले आहेत.
संस्कृती बालगुडेचा हा swag पाहिलात का? (फोटो सौजन्य - Social Media)
अभिनेत्री संस्कृती बालगुडेने तिच्या @sanskruti_balgude_official या इंस्टाग्राम हॅन्डलवर नवा फोटोशूट शेअर केला आहे.
या छायाचित्रांमध्ये सगळ्यात आकर्षित करणारी बाब म्हणजे संस्कृतीचा आऊटफिट... इतका सुंदर आऊटफिट तिने परिधान केला आहे की नेटकऱ्यांची नजर हटेना.
तिने तिच्या पोस्टला सुंदर असे कॅप्शन दिले आहे. कॅप्शनमध्ये Annie Finch यांच्या ओळी लिहल्या आहेत की," “…I found the muse in myself, And I loved Her fiercely..!” म्हणजेच स्वतःवर असलेल्या प्रेमाबद्दल सांगितले.
कॉमेंट्समध्ये चाहते तुटून पडले आहेत. कौतुकाचा भडीमार झाला आहे. चाहत्यांना तिचा आऊटफिट फार आवडला असल्याचे दिसून येत आहे.
अनेक चाहत्यांनी तर या छायाचित्रांना 'Picture of the day' म्हणून घोषित केले आहे. तसेच चाहत्यांनी तिला तिच्या आगामी प्रोजेक्टबद्दल विचारले आहे.