१ फेब्रुवारी २०२६ ला अर्थमंत्री निर्मला सीतारमण देशाचा अर्थसंकल्पीय बजेट सादर करणार आहेत. हा त्यांचा सलग नववा विक्रमी अर्थसंकल्प असेल. उद्या सादर होणाऱ्या बजेटची साऱ्यांचं उत्सुकता लागली आहे. दरवर्षी बजेट सादर करताना निर्मला सीतारमण वेगवेगळ्या राज्यातून तयार करण्यात आलेल्या हातमागावरील साड्या नेसतात. भारतातील पारंपारिक विणकामांना प्रसिद्धी आणि आकर्षण मिळावे तसेच हातमाग उद्योगाला चालना मिळवा, यासाठी निर्मला सीतारमण कायमच हातमागावरील साड्यांची निवड बजेटसाठी करतात. अर्थसंकल्पाच्या दिवशी निर्मला सीतारमण यांनी नेसलेल्या साड्यांच्या निवडीमुळे विविध पारंपारिक विणकाम आणि कापडांचे कौतुक देशभरात सगळीकडे होते. चला तर पाहुयात अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी २०२१ ते २०२५ दरम्यान नेसलेल्या साड्यांचे कलेक्शन आणि साडीची खास वैशिष्ट्य. (फोटो सौजन्य – pinterest)
अर्थमंत्री Nirmala Sitharaman यांनी २०२१ ते २०२५ दरम्यान नेसलेल्या साड्यांचे बजेटशी खास कनेक्शन

Untitled design (27)

२०२४ चा अर्थ संकल्प सादर करताना निर्मला सीतारमण यांनी किरमिजी रंगाची बॉर्डर असलेली रेशमी मंगलगिरी साडी परिधान केली होती. ही साडी आंध्र प्रदेशातील गुंटूर जिल्ह्यातील मंगलगिरी शहरात तयार केली जाते. या अर्थसंकल्पादरम्यान, आंध्र प्रदेशसाठी विशेष आर्थिक मदत जाहीर करण्यात आली होती.

अर्थमंत्री निर्मला सीतारमण २०२३ चा अर्थसंकल्प सादर करताना काळ्या रंगाची बॉर्डर असलेली लाल साडी परिधान केली होती. त्यांनी नेसलेल्या साडीवर मंदिराच्या कलाकृतीची डिझाईन होती. हातमागावरील साडी कर्नाटकात तयार करण्यात आली होती.

२०२२ मध्ये अर्थमंत्र्यांनी तपकिरी रंगाची बोमकाई साडी नेसली होती. ही साडी पूर्व भारतातील ओडिशा राज्यात बनवली जाते. याशिवाय साडीवर चंदेरी जरीचा वापर करण्यात आला आहे. ८ व्या शतकात ओडिशाच्या गंजम जिल्ह्यात सोनेपुरी साडी तयार करण्यात आली होती. त्यानंतर बोमकाई साड्यांना २०१२ मध्ये जीआय टॅग मिळाला.

२०२१ चा अर्थसंकल्प सादर करताना निर्मला सीतारमण यांनी लाल आणि ऑफ व्हाईट रंगाची सिल्क पोचमपल्ली साडी परिधान केली होती. साडीच्या पदरावर गुंतागुंतीचे इकत नक्षीकाम करण्यात आले होते. "व्होकल फॉर लोकल" मोहिमेला उजागर करण्यासाठी पारंपारिक हातमाग साडीची निवड करण्यात आली होती. २००५ मध्ये तिला भौगोलिक संकेत (GI) टॅग मिळाला.






