फोटो सौजन्य - Social Media
भारतीय डाक विभागाने (India Post) ग्रामीण तरुणांसाठी मोठी आनंदाची बातमी दिली आहे. ग्रामीण डाक सेवक (GDS) पदांसाठी 28,740 जागांची भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या भरतीची सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे कोणतीही लेखी परीक्षा किंवा मुलाखत घेतली जाणार नाही. उमेदवारांची निवड थेट 10वीच्या गुणांवर आधारित मेरिट लिस्टद्वारे केली जाणार आहे.
सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या आणि 10वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी ही भरती सुवर्णसंधी मानली जात आहे. देशभरातील ग्रामीण डाकघरे या भरतीद्वारे भरली जाणार असून, ग्रामीण भागातील तरुणांना स्थानिक पातळीवर नोकरीची संधी मिळणार आहे.
परीक्षा न देता मिळणार सरकारी नोकरी
India Post GDS भरतीमध्ये उमेदवारांना कोणत्याही प्रकारच्या स्पर्धा परीक्षेला सामोरे जावे लागणार नाही. 10वीमध्ये मिळालेल्या गुणांचे टक्केवारीत रूपांतर करून मेरिट लिस्ट तयार केली जाईल. त्यामुळे अभ्यासात चांगले गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना थेट फायदा होणार आहे.
GDS Salary: किती मिळतो पगार?
ग्रामीण डाक सेवकांचा पगार TRCA (Time Related Continuity Allowance) पद्धतीने दिला जातो. हा पगार ड्युटीचे तास आणि पदावर अवलंबून असतो.
GDS ही केवळ तात्पुरती नोकरी नाही, तर यामधून पुढे कायमस्वरूपी सरकारी पदांपर्यंत जाण्याचा मार्ग खुला होतो. काही वर्षांचा अनुभव घेतल्यानंतर उमेदवार विभागीय परीक्षांना बसू शकतात.
याशिवाय GDS कर्मचाऱ्यांना ग्रेच्युटी आणि सर्व्हिस डिस्चार्ज बेनिफिट स्कीमचा लाभही दिला जातो. निवृत्तीच्या वेळी ही योजना एकरकमी मोठ्या रकमेचा आधार ठरते.
या भरतीसाठी 31 जानेवारी 2026 पासून ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. उमेदवार खालील सोप्या स्टेप्सद्वारे अर्ज करू शकतात:






