अभिनेत्री शिल्पा शेट्टी तिच्या अनोख्या फिटनेसमुळे तरुणांच्या विशेष नजरेत असते. तिने केलेले लुक चाहत्यांच्या विशेष नोटीसमध्ये असतात. मग तिचा गणपती स्पेशल लुक असू देत किंवा कोणत्या तरी विशेष कार्यक्रमातील, शिल्पा नेहमीच तिच्या फॅशनमुळे चर्चेला उधाण आणते. दरम्यान, तिने शेअर केलेले काही छायाचित्रांनी सोशल मीडियावर लाईक्सचा वर्षाव आणला आहे.
शिल्पा शेट्टीचा नवा लुक पहा. (फोटो सौजन्य - Social Media)
अभिनेत्री शिल्पा शेट्टीने @theshilpashetty या सोशल मीडिया हॅण्डलवरून नवा Look शेअर केला आहे. नव्या लूकमध्ये अभिनेत्री फार सुंदर दिसत आहे.
विशेष म्हणजे अभिनेत्रीचा हा लुक जुन्या काळाची आठवण आणि एका सुप्रसिद्ध अभिनेत्रीची आठवण करून देणारा आहे.
शिल्पा शेट्टीने जेष्ठ अभिनेत्री जिनत अमानचा लुक केला आहे. गळ्यात आणि हातात रुद्राक्षाच्या माळा आणि डोळ्यावर चष्मा काळा, असा हा लुक आहे.
अभिनेत्रीने पोस्टखाली कॅप्शन दिले आहे की,"Paying homage to the epitome of grace, glam and timeless fashion, Zeenat Aman ji @thezeenataman thank you for inspiring us with your style and words even today"
ही पोस्ट जेष्ठ अभिनेत्रीसाठी आदरांजली असून चाहत्यांनी या लुकसाठी शिल्पाचे अभिनंदन केले असून भरभरून कौतुक केले आहे.