सणावाराच्या दिवसांमध्ये साडी किंवा ड्रेस परिधान केल्यानंतर महिला मुली हातामध्ये सुंदर सुंदर बांगड्या घालतात. बांगड्या घातल्यामुळे हातांचे सौंदर्य आणखीनच वाढते. याशिवाय बाजारात अनेक वेगवेगळ्या डिझाईन्सच्या बांगड्या उपलब्ध आहेत. मात्र हल्ली सोन्याच्या दागिन्यांची किंमत वाढल्यामुळे ते खरेदी करणं अनेकांना परवडत नाही. अशावेळी तुम्ही चांदीचे दागिने खरेदी करू शकता. चांदीचे किंवा ऑक्सिडाइज दागिने अंगावर अतिशय सुंदर दिसतात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला चांदीच्या बांगड्यांचे काही सुंदर डिझाइन्स आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – pinterest)
हातांच्या मनगटांमध्ये शोभून दिसतील 'या' सुंदर डिझाईन्सच्या चांदीच्या बांगड्या
चांदीच्या बांगड्या बनवताना तुम्ही कोणत्याही गोलाकार किंवा चौकोनी आकारात सुद्धा बांगड्या बनवून घेऊ शकता. यामध्ये तुम्ही सुंदर फुलांची किंवा बारीक नक्षीकाम केलेली डिझाईन बनवू शकता.
टेम्पल डिझाइन्समधील दागिने अतिशय सुंदर आणि उठावदार दिसतात. कोणतीही सिल्क किंवा कॉटनची साडी नेसल्यानंतर त्यावर तुम्ही चांदीची बांगडी किंवा कडा परिधान करू शकता.
काचेच्या बारीक खड्यांचा वापर करून बनवलेल्या बांगड्या तुम्ही कोणत्याही सणावाराच्या दिवसांमध्ये हातात घालू शकता.
कोरीवकाम किंवा जाळीचे काम करून बनवलेल्या बांगड्या हातामध्ये अतिशय सुंदर दिसतात. वजनाने हलक्या असल्या तरीसुद्धा खूप स्टयलिश आणि सुंदर लुक देतात.
काहींना रंगीत स्टोनचा वापर करून बनवलेल्या बांगड्या घालायला खूप आवडतात. या बांगड्या साडी किंवा डिझायनर ड्रेसवर आकर्षक दिसतात.