सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता अनिल कपूर यांची लेक अभिनेत्री सोनम कपूर आहे. इंडस्ट्रीपासून दूर असलेल्या सोनम कपूरने आपल्या फॅशनच्या जोरावर चाहत्यांमध्ये प्रसिद्धी मिळवली आहे. अभिनेत्रीने लग्नानंतर फिल्म इंडस्ट्रीला राम राम ठोकला आहे. अभिनयापासून दूर राहिलेल्या सोनमने इन्स्टाग्रामवर आपल्या फॅशनच्या माध्यमातून चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवले.
Sonam Kapoor Latest Photos
अभिनेत्री सोनम कपूर जरीही बॉलिवूडपासून दूर असली तरीही ती कायमच सोशल मीडियावर सक्रिय राहते. तिची नवीन फॅशन सध्या सोशल मीडियावर कमालीची चर्चेत आली आहे. फॅशन स्टायलिस्ट रिया कपूरने सोनमचे काही फोटो शेअर केले आहेत..
अभिनेत्री सोनम कपूरने आपल्या अभिनयाच्या जोरावर चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. कायमच अभिनयामुळे चर्चेत राहणाऱ्या सोनम कपूरचे काही तासांपासून इन्स्टाग्रामवर नवीन फोटोज तुफान व्हायरल होत आहे..
शेअर केलेल्या फोटोंमध्ये अभिनेत्रीने व्हाईट कलरचे स्टायलिश वेस्टर्न आऊटफिट वेअर करत अभिनेत्रीने कॅमेऱ्यासमोर एका पेक्षा एक हटके अंदाजात फोटो पोजेस दिल्या आहेत. तिच्या फॅशनने खरंतर सर्वांचेच लक्ष वेधले आहे.
अभिनेत्रीच्या हटके अंदाजातील स्टाईलने तिच्या सौंदर्याची भुरळ चाहत्यांवर पडली आहे. शिवाय अभिनेत्रीच्या स्टायलिश अंदाजातील लूकमधील सौंदर्याचे कौतुकही चाहते करीत आहेत.
हेअर बन, स्मोकी मेकअप, पिंक लिपस्टिक, डार्क आय लाईनर आणि गळ्यात लॉकेट असा लूक करून अभिनेत्रीने कॅमेऱ्यासमोर सुंदर फोटोशूट केले आहे. सोनमने आपला संपूर्ण लूक व्हाईट डायमंड ज्वेलरीने पूर्ण केला आहे.
सोनम कपूरच्या ह्या व्हायरल होणाऱ्या नव्या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला जात आहे.