सणावाराच्या दिवसांमध्ये सगळ्यांचं नवीन कपडे घालून सुंदर नटून थटून तयार व्हायला खूप जास्त आवडत. साडी किंवा रेडिमेड ड्रेस घालून सुंदर लुक केला जातो. मात्र कायमच रेडिमेड ड्रेस घालण्यापेक्षा आईच्या जुन्या काठपदर साड्यांपासून सुंदर ड्रेस शिवता येईल. सगळीकडे काठपदर साड्यांची मोठी क्रेझ आहे. काठपदर किंवा पैठणी साडीपासून वेगवेगळ्या डिझाईनचे ड्रेस शिवून घेतले जातात. आज आम्ही तुम्हाला सणावाराच्या दिवसांमध्ये पारंपरिक आणि मॉर्डन लुक हवा असेल तर तुम्ही या सुंदर पॅटर्नचे ड्रेस शिवून घेऊ शकता. काठपदर साड्यांची बॉर्डर मोठी असते. त्यामुळे हातांना किंवा ड्रेसच्या गळ्याला साडीची बॉर्डर लावून घेऊ शकता. (फोटो सौजन्य –pinterest)
गौरी गणपतीच्या सणाला काठपदर साडीपासून शिवा स्टायलिश पॅटर्नचे सुंदर ड्रेस
हल्ली सर्वच मुली कुर्तीवर प्लाजो परिधान करतात. कुर्तीच्या रंगला मॅच होईल असा प्लाजो परिधान करून त्यावर तुम्ही नेट किंवा इतर कोणत्याही डिझाईनची ओढणी घेऊन परिधान करू शकता.
काठपदर साडीच्या पदराचा वापर करून तुम्ही या डिझाईनचा सुंदर ड्रेस शिवू शकता. स्कर्ट आणि टॉप पार्टनमधील ड्रेस सणावाराच्या दिवसांमध्ये परिधान केल्यास मराठमोळा लुक दिसेल.
काठपदर साडीचा कुर्ता आणि पायजमा शिवून त्यावर तुम्ही कॉन्ट्रास्ट दुपट्टा निवडू शकता. काठपदर साडीची वापर करून शिवलेला ड्रेस परिधान केल्यानंतर मॉर्डन लुक दिसेल.
काठपदर किंवा पैठणी साडीचा वापर करून तुम्ही साऊथ इंडियन पार्टनमधील साडी शिवून घेऊ शकता. साडीचा घागरा आणि साडीच्या पदरापासून तयार केलेला ब्लाऊज अतिशय उठावदार दिसेल.
सहावारी किंवा दहावरी साडीचा वापर करून शिवलेले अनारकली ड्रेस तुमच्यावर अतिशय सुंदर दिसतील. अनारकली ड्रेसवर तुम्ही ओढणी सुद्धा घेऊ शकता.