तुम्ही आजवर झाडावर पानं, फुलं आणि फळे लागलेली पाहिली असतील. मात्र तुम्ही कधी इथे नोटा किंवा कोणत्या झाडावरून सोन्याच्या नाण्यांचा वर्षाव होताना कधी पाहिला आहे का? हे चमत्कारी दृश्य सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यात काही लोक झाडावरून पडणारी सोन्याची नाणी गोळा करताना दिसून आली.
काय सांगता! अचानक झाडावरून होऊ लागला सोन्याच्या नाण्यांचा वर्षाव, पान नाही तर नोटांनी भरले वृक्ष; पाहूनच डोळे दीपतील
व्हिडिओमध्ये, मुले, वृद्ध आणि महिला सर्वजण झाडांवरून पडलेले नाणी गोळा करण्यात व्यस्त दिसत आहेत, जणू काही गावात खजिन्याचा पाऊस पडत आहे
तसेच यात अशी अनेक झाडे दाखवली आहेत ज्यांच्या फांद्यांवर पानांऐवजी नोटा आहेत. एका झाडाच्या आतून नव्हे तर अनेक झाडांमधून सोन्याचे नाणे वाहत असल्याचे यात दिसून आले
एका दृश्यात, एक शेतकरी त्याच्या शेतातील मातीत नोटांची लागवड करताना दिसतोय, जे पाहून असं वाटतंय की आता शेतात गव्हाऐवजी नोटा उगवत आहेत
मात्र हे सर्वच दृश्य काही खरे नसून ही फक्त कल्पना आहे जिला एआयद्वारे एक अनोखे रूप डदेण्यात आले आहे. आर्टिफिशियल इंटेलिजेंसची मदत घेऊन एक गाव जिथे पैशांची झाडे असल्याचे दृश्य दाखवण्यात आले आहे
हे कलानिक जग फक्त लोकांच्या मनोरंजनासाठी तयार करण्यात आले आहे. यातील दृश्ये फारच सुंदर असून लोकांना या दृश्यांची चांगलीच भुरळ पडली आहे